डाँ.तनपुरे कारखान्याची जमीन विक्रीस विरोध करणार;धुमाळ

0

कारखान्याचे असंतुलन 540 कोटीवर पोहचले

कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी औरंगाबाद खंडपिठात याचीका दाखल

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे 

                  डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पर्यंत खुल्या मैदानात झालेली असताना यावर्षी माञ अवघे शंभर लोक बसतील अशा बंदिस्त ठिकाणी सभा घेतली जाणार आहे. याचा निषेध करण्यात येत आहे.कारखाना व सभासद यांच्या मालकीच्या सर्व जमिनी विक्री करण्याचा घाट घातला आहे. राहुरी कारखाना बचाव कृती समिती स्थापन करुन जमिन विक्रीस विरोध करणार आहे.वेळ प्रसंगी आंदोलने मोर्चे काढण्यात येतील. कारखान्यावर 200 कोटीचे असंतुलन असताना विखेंच्या ताब्यात कारखाना दिला होता.आज माञ 540 कोटीचे असंतुलन झालेले आहे. कारखान्याची निवडणूक लावण्यासाठी औरंगाबाद खंडपिठात याची दाखल केली आसल्याचे रामदास धुमाळ विचार मंचचे तालुकाध्यक्ष अमृत धुमाळ यांनी सांगितले.

             डाँ.तनपुरे कारखान्या संदर्भात अमृत धुमाळ, माजी.खा. प्रसाद तनपुरे, अरुण कडू,पंढरीनाथ पवार,सुरेश वाबळे,अँड भाऊसाहेब पवार, अशोक ढोकणे आदींनी आयोजित केलेल्या पञकार परीषदेत धुमाळ बोलत होते.

               धुमाळ पुढे म्हणाले की,गेल्या अनेक वर्षा पासुन कामगारांचे देणे कारखाना प्रशासनाकडून थकविण्यात आले आहे.कामगारांनी औरंगाबाद खंडपिठाच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.खंडपिठाने जिल्हाधिकारी यांना वसुली करुण कामगारांचे थकीत देणी देण्याचे आदेश दिले. कामगारांची देणी देण्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत देवळाली प्रवरा हद्दीतील  एकुण 21 प्रकारच्या जमिणी विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.जमिण विक्रीचा निर्णय राजकीय स्वार्था पोटी घेतला जात आहे.सत्ताधारीने मंडळाने आपल्या बगलबच्चाना जमिणी विकत घ्यायला लावून स्वतःच्या घशात घालण्याचा डाव रचित आहेत.कामगारांची देणी साखर पोती, माँलेसेस विक्री,भंगार विक्रीतून कामगारांचे थकीत देणी देता आली असती. परंतू  सत्ताधारी मंडळाने तसे केले नाही.जमिण विक्रीतून कामगारांची देणी देवू शकत नाही.जिल्हा बँकेचे 110 कोटीचे कर्ज कारखाना परत फेड करु शकत नाही.कारखान्यावर इतर वित्तीय संस्थांची देणी विचार करता सभासदांच्या कष्टातून उभा राहिलेला डाँ.तनपुरे कारखाना केवळ राजकीय हव्यासापाई पुर्णपणे कोलमडून पडल्याचे चिञ आहे.कारखाना हा खाजणगी मालमत्ता मध्ये रुपांतरीत करण्यासाठी राजकीय नेत्यांनी घाट घातला घातला आहे.

             महसुलमंञी राधाकृष्ण विखे व खा.सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घाई घाईने लिलावाची प्रक्रीया करुनआपले हित साधण्याचे षडयंञ रचले आहे.कारखाना कामधेनू वाचवायची असेल तर सर्व सभासद कामगारांनी संघटीत होवून लढा उभरणे गरजेचे आहे.जिल्हा बँकेने यापुर्वीच जप्तीची कारवाई करुन ताब्यात घेतली आहे.असे असतानाही जप्ती झालेल्या जमिणीचा लिलाव प्रक्रीया कशी घेणार  याकडे सभासद कामगारांचे लक्ष लागले आहे.  

        धुमाळ पुढे म्हणाले की,कामधेनू वाचविण्यासाठी उच्च न्यायालयाचा आदर करुन जमिण विक्री न करता कामगारांचे थकीत देणी कसे देता येईल याचा विचार संचालक मंडळाने करावा. डाँ.तनपुरे कारखान्याची जमिन विक्री झाली तर कारखान्याचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.तालुक्यातील ऊस शेती धोक्यात येऊन बाजारपेठ व शेतकरी अडचणित सापडणार आहे.असे धुमाळ यांनी सांगीतले.

         जमिण विक्री  निर्णया संदर्भात विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा का बोलवली नाही.पाच वर्षाच्या कालावधीत जमिण विक्री ,माँलेशस विक्री,भंगार विक्री,साखर विक्री यातुन कामगारांचे थकीत देणी देण्याची व्यवस्था का केली नाही. सध्याच्या जमिन विक्रीत शिवाजी पुतळा, मंगल कार्यालय, कामगार वसाहात, व्यापारी संकुल, अतिथीगृह, सेंट्रल आँफीस, गोडावून, कारखाना उभा असलेली जागा अशा 21 जागा विक्री करण्यात येणार आहे. या सर्व जागा विक्री करताना विखेंचे बगलबच्चे जमिनी खरेदी करुन विखेंच्या घशात घातली जाणार आहे.असे धुमाळ यांनी सांगितले.

यावेळी पंढरीनाथ पवार , अरुण कडू,अशोक ढोकणे, अँड भाऊसाहेब पवार आदींनी आपले विचार मांडले. 

चौकट

…….आणि माजी.खा. प्रसाद तनपुरे बोललेच नाही.!

        डाँ.तनपुरे कारखान्याची जमिण विक्री प्रकरणी आयोजित पञकार परीषदेत माजी.खा.प्रसाद तनपुरे यांना पञकारांनी अनेक वेळा तुम्ही बोला असे म्हटले असता तनपुरे यांनी माञ धुमाळ यांच्याकडे बोट दाखवत ते बोलतील असे सांगुन डाँ.तनपुरे कारखान्यावर बोलण्याचे त्यांनी जाणीवपुर्वक टाळले. का? डाँ.तनपुरेच्या वादात न पडण्याच्या निर्णया मुळे तनपुरे यांनी पञकारांशी बोलण्याचे टाळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here