डॉ.आंबेडकर, बुद्ध व माता रमाई मूर्तीची प्रतिष्ठापणा संपन्न

0

सातारा/अनिल वीर : भक्तवडी गावात दानदाते विजय जाधव आणि कुंटूबियांच्यावतीने तथागत भगवान बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्ती विहारासाठी दान दिलेल्या आहेत.त्या मुर्तींच्या प्रतिष्ठापना  भंते दिपंकरजी यांच्या हस्ते करण्यात आली.

         सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लीकन सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व पुर्व जिल्हा महासचिव सुनिल कदम,भारतीय बौध्द महासभा जिल्हा महासचिव तथा सन २०२२चे बंधुत्व धम्म-प्रचार पुरस्कार विजेते विद्याधर गायकवाड व बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते दिलीप फणसे, सन २०२०चे बंधुत्व जीवन गौरव पुरस्कार विजेते नंदकुमार काळे व अनिल कांबळे(अध्यक्ष,भारतीय बौद्ध महासभा,कोरेगाव),भाऊ मोहड, सरपंच नानासो. बडेकर, विजय मोरे, लक्ष्मणतात्या,संदेश कांबळे, तुकाराम कांबळे,बाबा आवाडे,दिलीप सावंत,द्राक्षा खंडकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.

    याकामी,शर्मिला आवडे,अमोल गायकवाड,देवानंद आवडे, शांताराम आवडे,तरुण मंडळ व महिला मंडळ आदींनी अथक असे परिश्रम घेतले. शर्मिलाताई आवडे यांनी आभारप्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here