सातारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
येथील प्रमिला मंगल कार्यालयात एका कार्यक्रमात डॉ.दाभोळकर यांच्या जयंतीनिमित्त संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे व बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी सूतोवाच केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे प. जिल्हाध्यक्ष भागवत भोसले, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार काळे,तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने रिपब्लिकन सेनेचे प. महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, सदस्य गणेश कारंडे, विलासराव कांबळे ,पी.डी. साबळे, रमेश इंजे युवा शाहिर गायकवाड,प्रभाकर बनसोडे, साळवे शाहिर श्रीरंग रणदिवे, किरण जगताप, अनिल जगताप, दिलिप फणसे,भन्ते दिंपकरजी, अरुण जावळे,यशपाल बनसोडे, राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे ऍड.विलास वहागावकर, बबन वन्ने, धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे, प्राचार्य प्रकाश रणबागले,रामचंद्र गायकवाड,विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.