डॉ.सोमनाथ गिते यांचे व्यसनमुक्तीत मोठे काम ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडून कौतुक

0

संगमनेर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नुकतेच पुण्यात आले होते. यावेळी डॉ.सोमनाथ गिते यांनी त्यांची भेट घेतली आणि राज्यपालांसोबत व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा केली. यावेळी राज्यपालांनी देखील डॉ.सोमनाथ गिते यांच्या कार्याचे कौतुक केले व प्रशंसापत्र दिले. तसेच व्यसनमुक्तीचे कार्य आवश्यक असून हे कार्य असेच सुरु ठेवा, व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी तुमच्या कार्याचा समाजाला नक्की फायदा होईल, असेही ते म्हणाले. काहीही गरज भासल्यास मदत करण्याचे आश्वासन देखील राज्यपालांनी दिले. विशेष म्हणजे डॉ.सोमनाथ गिते हे संगमनेर तालुक्यातील शिबलापूरचे भुमिपुत्र व रहिवासी आहेत.

          डॉ.सोमनाथ गिते यांनी मागील काही काळापासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले असून यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान याबाबत सद्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. गिते यांना पत्र पाठवत त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या भेटीत राज्यपाल व डॉ.गिते यांच्यात यावर विस्तृत चर्चा झाली. राज्यपालांनी यावेळी कौतुकाची थाप देत समाजासाठी चांगले काम करत असल्याचे म्हटले आहे. राज्यपालांनी पाठवलेल्या प्रशंसापत्रात म्हटले आहे कि, समाजामध्ये व्यसनाचे भीषण परिणाम दिसत आहेत. व्यसनाचे दुष्परिणाम एकट्या व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. व्यसनी व्यक्तीच्या समुपदेशनाबरोबरच शाळा, महाविद्यालयांत जाऊन डॉ.गिते व्यसनमुक्तीबदल जनजागृती करतात. मी त्यांच्या या समर्पित कार्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये यश मिळावे अशा शुभेच्छा देतो.या पत्राबाबत डॉ. सोमनाथ गिते म्हणाले कि महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माझ्या कामाचे कौतुक करून मला प्रशंसापत्र दिले. हे माझ्यासाठी तसेच माझ्यासारख्या अनेक व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचे आहे. आज  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर व्यसनमुक्ती या विषयावर विस्तृत चर्चा झाली, तसेच त्यांना कामाचा अहवाल सादर केला. मला पुरस्कार मिळाल्याबद्ल त्यांनी माझे अभिनंदन केले. पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व गरज भासल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. यामुळे व्यसनमुक्तीचे कार्य करण्यास प्रोत्साहन मिळाले असल्याचे डॉ.गिते यांनी सांगितले.

दरम्यान सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची आणि या क्षेत्रातील केलेल्या अभ्यासाची दखल घेत विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून डॉ. गिते यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरिवण्यात आले आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, आमदार मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज बेलदरे, वर्षा विद्या विलास यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले असून शिबलापूर सह पंचक्रोशीतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चौकट :- डॉ. गिते यांना मिळालेले पुरस्कार..!

डॉ. सोमनाथ गिते यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व यश मेडिकल फाऊंडेशनचा व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२, व्यसनमुक्ती परिषदेकडून दिला जाणारा मानाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादूत पुरस्कार २०२२ तसेच डॉक्टरेट पदवीनेही गौरवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here