सातारा/अनिल वीर : ग्रामपंचायत तडवळे सं वाघोली व तालुका कृषिअधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.३ रोजी सायंकाळी ५ वा.विठ्ठल रुक्मिणी मंदिर,तडवळे सं वाघोली,ता. कोरेगाव येथे रब्बी हंगाम घेवडा पीक उत्पादन वाढ शेतकरी प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोरगाव कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.भूषण यादगीरवार उपस्थित राहणार आहेत.सरपंच नानासाहेब बडेकर अध्यक्षस्थान भूषावणार आहेत.यावेळी उपसरपंचराहुल भोईटे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोईटे,तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके,मंडल कृषी अधिकारी अजित जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तेव्हा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.