तुळजाभवानी मातेची मानाच्या पालखीचे जामखेड शहरात आगमन ; ‘संघर्ष’ तर्फे भाविक भक्तांना लाडु वाटप

0

जामखेड तालुका प्रतिनिधी
                  नवरात्रीनिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची मानाच्या पालखीचे सातव्या माळीला शहरात भक्तीमय वातावरणात आगमन झाले यावेळी मेन पेठेतील कोठारी कॉर्नर येथे ‘संघर्ष’ अन्नदान फाऊंडेशन यांच्या वतीने भक्तांना राजगिरा लाडु वाटप करण्यात आले
                 सबंध महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलली तुळजापूरची तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ समजलं जातं. या मातेचा नवरात्र उत्सवातील पलंग आणि पालखी परंपरेप्रमाणे अहमदनगर येथून रवाना झाला.या पालखीचे आज दि ०२ रोजी जामखेड शहरात आगमन झाले.तुळजाभवानी मातेचं माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुऱ्हाणनगर येथून निघालेली पालखी आणि जुन्नरला तयार होऊन आलेल्या पलंगाची भेट अहमदनगर जवळच्या भिंगार (बुऱ्हाणनगर) येथे होते.यावेळी संघर्ष तर्फे कोठारी कॉर्नर येथे भाविक भक्तांना सुमारे २ हजार राजगिरा लाडु वाटप करण्यात आले यावेळी स्वप्नील बरबडे,संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन राळेभात, संतोष निमोणकर, राजेंद्र चौरेविशाल लोळगे,पत्रकार ओंकार दळवी किरण भोरे,अशोक हुलंगुंडे, संजय फुटाणे,ऋषीकेश ओझर्डे, मंदार पुजारी साहिल कोल्हे,आदींसह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here