तेलंगणातील भाजप आमदाराचे महंमद पैगंबराबाबत आक्षेपार्ह विधान !

0

भाजपचे तेलंगाणातील आमदार टी. राजा सिंह यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भाजपने त्यांचे निलंबन केले आहे. याआधी तेंलगाणा पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

हैद्राबाद : भाजपचे तेलंगाणातील आमदार टी. राजा सिंह यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भाजपने त्यांचे निलंबन केले आहे. याआधी तेंलगाणा पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

भाजपने टी. राजा यांना नोटीस दिली आहे, तुमचे निलंबन का करण्यात येऊ नये याबद्दल कारणे दाखवा नोटीस टी. राजा सिंह यांना बजावली आहे. पक्षाने त्यांना दहा दिवसांचा अवधी दिला आहे.

कॉमेडियन मुन्नवर फारूकीचा हैदराबादमध्ये कॉमेडी शो होता. त्याला टी. राजा सिंह यांनी विरोध केला. मुन्नवर फारूकीने हिंदू देवी देवतांची टिंगल उडवली त्यामुळे त्याचा शो होऊ देऊ नये असे राजा सिंह यांचे म्हणणे होते.

गोशामहल येथील भाजपचे आमदार राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी काही वक्तव्यं केली. त्यावरून वादाला तोंड फुटले. सोमवारी रात्री हैदराबाद येथील मुस्लिमांनी राजा सिंह यांच्या अटकेची मागणी केली होती.

हैदराबादमधल्या भाग्यलक्ष्मी मंदिराचा खरा इतिहास काय आहे?
चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषेचा वापर केला म्हणून हैदराबाद पोलिसांनी राजा सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अटकेनंतर राजा सिंह यांना बोल्लाराम पोलीस स्थानकात नेण्यात आलं.

ओवैसी यांनी व्यक्त केला निषेध
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी याबाबत भाजपचा निषेध केला आहे.

भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी सातत्याने मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधातील विधान करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. याआधी नुपूर शर्मांनी देखील असे विधान केले होते याची आठवण ओवैसी यांनी करून दिली.

या विषयावर ओवैसी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले “भाजप हे मुद्दामहून करत आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी त्यांच्या मनातील राग यातून दिसून येतो.”

ज्याप्रमाणे मुन्नवर फारूकीने हिंदू देवतांची खिल्ली उडवली त्याच प्रकारे हा देखील कॉमेडीचाच प्रकार असल्याचे टी. राजा सिंह यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत टी. राजा सिंह?
टी. राजा गोशामहल मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजकारणात येण्याआधी ते बजरंग दलाचे कार्यकर्ते होते.

२०१४ च्या निवडणुकांआधी टी. राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी ते तेलुगू देसम पक्षात होते. २००९ मध्ये ते तेलुगू देसमच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गोरक्षण अभियानासाठी ते हैद्राबाद आणि परिसरात ओळखले जातात.

तेलंगणात २०१८ च्या निवडणुकांमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीची हवा होती, त्यावेळी अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, त्यातही तेलंगणा भाजपचे 5 आमदार निवडून आले होते त्यापैकी एक टी. राजा होते.

टी. राजा यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी ७५ पेक्षा जास्त तक्रारी दाखल आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी सोशल मीडियावर अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत.

टी. राजा यांची वादग्रस्त वक्तव्ये
टी. राजा सिंह यांनी याआधी देखील अनेक वादग्रस्त विधानं केली आहे.

2021 मध्ये टी. राजा म्हणाले होते की “जे लोक बीफ खातात त्यांनी राम मंदिरासाठी देगणी देऊ केल्यास ती घेऊ नये. अशा लोकांकडून एक रुपया देखील स्वीकारू नये,” असे म्हटले होते.

“जे लोक वंदे मातरम म्हणणार नाहीत त्यांना या देशात राहण्याचा अधिकार देखील नाही,” असे देखील त्यांनी म्हटले होते.
“जुने हैदराबाद हे मिनी पाकिस्तान आहे,” असे देखील वक्तव्य केले होते. आणि जर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी छापे मारले तर त्यांना खूप सारे बॉम्ब आणि हत्यारे सापडतील असे विधान त्यांनी केले होते.
पद्मावत चित्रपटावेळी देखील टी. राजांनी वक्तव्य केले होते, जर या चित्रपटात हिंदूची प्रतिमा खराब दाखवण्यात आली असेल तर आम्ही त्याचे प्रदर्शन थांबवू असे त्यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here