…. त्या जि. प. मुख्यकारी अधिकारी यांच्या बैठकीवर बहिष्कार !

0

सातारा : जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर घेतलेल्या बैठकीवर कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा बहिष्कार घातल्याची माहिती जिल्हाध्यक्ष  अजित वाघमारे यांनी दिली.

               सन २०२० पासुन कास्ट्राईबने वारंवार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बैठकीबाबत विषय पत्रीका देऊनही  कोणत्या न कोणत्या कारणाने सामान्य प्रशासन विभागाने सदरच्या  बैठका रद्द केलेल्या आहेत . सा प्र विभाग जाणीवपूर्वक कास्ट्राईब संघटनेस दुजाभावाची व भेदभावाची  वागणुक देत आहेत.अशी संघटनेची धारणा आहे . मागासवर्गीयांच्या सेवा विषयक प्रश्नाकडे सा प्र .विभाग डोळेझाक पणा करीत आहे. म्हणूनच नुकत्याच झालेल्या बैठकीवर कास्ट्राईब बहीष्कार टाकत असून यापुर्वी कास्ट्राईबने दिलेल्या विषयक पत्रिकेनुसार तात्काळ कास्ट्राईब साठी स्वतंत्र बैठक लावण्यात यावी .अशीही मागणी करण्यात आली आहे. मागासवर्गीयांच्या प्रश्नाबाबत जि प . ( समाज कल्याण विभाग ) यांच्यामार्फत मागासवर्गीय कक्षाचे काम फक्त कागदावरच दाखवले जाते . जि . प . अधिनस्त असणाऱ्या मागासवर्गीय कर्मच्या-यावर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना गेल्या दोन वर्षामध्ये मागासवर्गीयांना बैठका नाकारणे कितपत योग्य आहे . सातारा जिल्हा परिषदचे ब्रिद वाक्य “बहुजन हिताय बहुजन सुखाय ” असे आहे.मात्र, या अश्या कारभारामुळे बहूजनाचे कर्मचाऱ्यांचे  हित दिसुन येत  नाही . निश्चीतच ही बाब निंदनीय आहे . अशा आशयाचे निवेदन मा . विभागीय आयुक्त व मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here