दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

0

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

              कोळपेवाडी वार्ताहर – सहकार क्षेत्रात अग्रगण्य कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२/२३ या वर्षाच्या ६८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ बुधवार दिनांक ५/१०/२०२२ रोज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी १०.३० वाजता कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीप बोरनारे  व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अलकाताई दिलीप बोरनारे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून होणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे.

               माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर तसेच कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मागील दोन वर्ष कोरोना संकटाची महामारी असल्यामुळे बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ साध्या पद्धतीने व मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. मात्र यावर्षी कोरोना संकटाची तीव्रता कमी झाली असून निर्बंध देखील हटविण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी हा कार्यक्रम निर्बंधमुक्त वातावरणात साजरा केला जाणार आहे. कारखान्याच्या या ६८ व्या गळीत हंगामाची सुरुवात बॉयलर अग्निप्रदीपन व विधिवत पूजा करून होणार आहे या कार्यक्रमास सर्व  सभासदांनी व कारखान्यावर प्रेम करणा-या हितचिंतकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे व  कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here