दहिवडी पोलिसांची गांजा विक्रीविरोधात कारवाई.

0

गोंदवले – माण तालुक्यातील मार्डी येथे पोलिसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने मकासारख्या पिकात गांजा लागवड करून त्याची विक्री करत असल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळताच वेशांतर करून गुडगाभर चिखलातुन शेतात छापा टाकला.यावेळी नऊ लाख नऊ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

     राहुल तुकाराम गायकवाड वय 23 असे दहिवडी पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, मार्डी येथे पोलिसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने मक्यासारख्या पिकात गांजा लागवड करून त्याची विक्री करत असल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे दहिवडी पोलिसांनी वेशांतर करून गुडगाभर चिखलात घुसुन शेतात छापा टाकला या छाप्यात दहिवडी पोलिस ठाण्याच्या इतिहासातील आजपर्यंतची गांजा विक्रीविरोधात सर्वात मोठी कारवाई करत राहुल गायकवाड याच्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत सपोनि अक्षय सोनवणे यांनी कारवाई करत नऊ लाख नऊ हजा रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सपोनी अक्षय सोनवणे यांच्यासह संजय केंगले,प्रकाश हांगे,निलम रासकर आदी पोलिसांनी केली.

छाया – मार्डी ता.माण येथे गांजाविरोधी कारवाईतील संशयित आणि मुद्देमालासह दहिवडी पोलीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here