सातारा : येथील दिपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे प्राचार्य राजेंद्र शेजवळ यांचा नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अध्यक्ष शिरीष चिटणीस होते.
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव (प्रशासन) व लाल बहादूर शास्त्री कॉलेज, साताराचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांची राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयांचे परीक्षण करणाऱ्या नॅक समितीकडून NAAC Assessor (नॅक परिक्षक) म्हणून अभिनंदनीय निवड झाली आहे.त्या अंतर्गत उत्तर प्रदेश मधील एका नामांकित महाविद्यालयाचे assessment करणाऱ्या टीमचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाल्याचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यांच्या या सन्माननीय निवडीबद्दल दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करताना प्रकाश गवळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सागर पावशे, शिरीष चिटणीस, अनिल वीर, विजय साबळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ हे शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे सचिव असून सातारा जिल्हा प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या सन्माननीय निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो : प्राचार्य राजेंद्र शेजवळ यांचा सत्कार करताना प्रकाश गवळी शेजारी शिरीष चिटणीस, पावसे व मान्यवर.