दिवाळी किट ‘या’ तारखेपासून वाटप; प्रत्येक तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या हस्ते होणार वाटपाचा शुभारंभ

0

पंदरपुर, प्रवीण शहा : शिंदे सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रती कुटुंब एक दिवाळी किट देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात अंत्योदय ६० हजार ५५२ तर अन्नसुरक्षा योजनेचे ४ लाख ६१ हजार ७४२ लाभार्थी आहेत.
          पण एकूण लाभार्थ्यांच्या ९७ टक्के म्हणजेच ५ लाख ५ हजार किट उपलब्ध होणार आहेत.

१५ ऑक्टोबरपर्यंत सर्व दुकानांमध्ये रेशनचे किट उपलब्ध होतील, त्याचे वाटप १७ ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे फोटो असल्याचे कळते.

दिवाळीसाठी देण्यात येणार किट वेळेत पोहोचण्यासाठी संपूर्ण प्रशासन प्रयत्न करीत आहे . अद्याप शासनाकडून गोदामात एकही वस्तू आली नाही.

किट पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह कन्झुमर फेडरेशनला देण्यात आली आहे. प्रशासनाने फेडरेशनकडे ५ लाख ५ हजार किटची मागणी नोंदविली आहे. तेल व इतर साहित्याच्या पॅकिंगवर पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे फोटो असल्याचे कळते.

शहरातील लाभार्थी

११ लाख १० हजार अन्नसुरक्षा ६१५४ > अंत्योदय एकूण अंत्योदय ६० हजार ५५२,

ग्रामीण लाभार्थी

३ लाख ५१ हजार ७२४ अन्नसुरक्षा ५४ हजार ३ ९ ८ अंत्योदय अन्नसुरक्षा ४ लाख ६१ हजार ७४२

अन्नसुरक्षा केवळ १०० रुपयांत रवा , दाळ, साखर ..

● शहर , जिल्ह्यासाठी दिवाळी सणासाठी एक किलोचे पॅकेट असलेले रवा , हरभरा दाळ , तेल व साखर या वस्तू १०० रुपयांत देण्यात येणार आहे . सोमवारपासून पामतेल उपलब्ध होणार आहे , त्यानंतर ५० किलोच्या बॅगमधून रवा , हरभरा दाळ व साखर मिळणार आहे . १५ ऑक्टोबरपर्यंत सर्व वस्तू दुकानात उपलब्ध होतील , १७ ऑक्टोबरपासून वाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. सुनील पेंटर, जिल्हाध्यक्ष रेशन दुकानदार संघटना

उपायुक्त कुलकर्णी यांनी घेतली बैठक .

पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहावर पुरवठा विभागाची बैठक घेतली . पुणे विभागातील पाच जिल्ह्यात २८ लाख लाभार्थ्यांना दिवाळीचे किट देण्यात येणार आहे तर सोलापूर जिल्ह्यात ५ लाख ५ हजार किट उपलब् होणार आहेत .

शहर , ग्रामीणमधील लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी वाटप करण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या . प्रत्येक लाभाथ्यांना वेळेत धान्याचे किट मिळेल , अशा सूचना दिल्या.

शासनाकडून सीलबंद मिळालेल्या किटचे तसेच वाटप करावे , एक किलोचे पॅकेट असलेले रवा , हरभरा दाळ , तेल व साखर या वस्तू १०० रूपयांत विक्री करण्याच्या सूचना श्री.कुलकर्णी यांनी दिल्या 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here