सातारा/अनिल वीर : पहाटेचे आल्हाददायक वातावरण व पसरलेला मंद सुगंध असलेल्या येथील शाहूपुरीच्या मध्यवर्ती चौकात मराठी-हिंदी सुश्राव्य सुमधुर गीतांनी रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिवाळीच्या पहाटे दिल्याने सर्व रसिक श्रोते मंत्र मुग्ध झाले.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, शाखा – शाहूपुरी येथे आयोजित सचिन शेवडे प्रस्तुत मराठी गीतांचा सुश्राव्य समधुर स्वर हा कार्यक्रम दीपलक्ष्मी पतसंस्था शाखा शाहूपुरीच्या प्रांगणात संपन्न झाला.
हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सणापैकी दिवाळी सण हा सर्व सणांचा शिरोमणी असल्याने दिवाळी म्हणजे दीपतेज अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणारा सण असल्याने या कार्यक्रमाची सुरुवात रंगदेवता व रसिक जणांना वंदन करून झाली. बुद्धीचे आराध्य दैवत प्रथमेश व ६४ कलांचे अधिपती श्री गणेश वंदनाने झाली.या स्वर कार्यक्रमात युगलगीत, सोलो गीत, प्रार्थना , गवळण , भैरवी,लावणी आदी प्रकारच्या गीतांचा समावेश करण्यात आला होता. “तू बुद्धी दे” हे गाणे प्राजक्ता भिडे व सहकाऱ्यांनी गायले. यानंतर प्राजक्ता भिडे यांनी, “उठ मुकुंदा उठ श्रीहरी”ची भूपाळी सादर केली. पल्लवी बडकस यांनी “मोगरा फुलला” हे गीत सादर करून सर्वांची मने जिंकली. नितीन काटे यांनी वासुदेवावर आधारित,”उजळून आलय आभाळ” हे गीत सादर करून सर्वांना एकच ठेका धरायला लावला. “केव्हा तरी पहाटे” हे गीत प्राजक्ता भिडे यांनी सादर केले.”तू तेव्हा तशी” हे गीत सचिन शेवडे यांनी सादर करून सर्वांच्या पसंतीची पावती मिळवली.बालकलाकार स्वरांगी शेवडे हिने, “उठा उठा चिऊताई” हे गीत सादर केले. पल्लवी बडकस यांनी “चाफा बोलेना” हे गीत सादर केले. “भेटी लागी जीवा” हे भक्तीगीत प्राजक्ता भिडे यांनी सादर केले. “हा नंदाचा कान्हा कसा घालतो धिंगाणा?” हे गीत नितीन काटे यांनी उत्तम प्रकारे सादर केले. या गाण्याला रसिक श्रोत्यांचा वन्स मोअर मिळाला. सचिन व प्राजक्ता यांनी “शुक्रतारा मंद वारा ” हे युगल गीत सादर केले.” मनाच्या धुंदीत लहरीत येना ” हे गीत नितीन काटे यांनी सादर केले. “का रे अबोला कारे दुरावा ” व “राजा ललकारी” हे गीत प्राजक्ता यांनी सादर केले. “राधा ही बावरी ” हे गीत नितीन काटे यांनी सादर करून सर्वांना ठेका धरायला लावला. “दिस चार झाले मन पाखरू होऊन” हे गीत प्राजक्ता यांनी सादर केले. सचिन व त्यांचे सर्व सहकारी यांनी “आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर” हे गाणे गाऊन या कार्यक्रमाची उंची वाढवली. सचिन व प्राजक्ता यांनी “जीव रंगला, गुंगला” हे युगल गीत सादर केले. नितीन काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी “आली लचकत नार ठुमकत…… हिरव्या रानी” ही गवळण सादर केली. “तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे” हे गीत मधुकर शेंबडे यांनी सादर केले. या कार्यक्रमाचा शेवट प्राजक्ता भिडे यांच्या, “आली माझ्या घरी ही दिवाळी ” या अजरामर गाण्याने झाली.
सदरच्या कार्यक्रमामध्ये गायक कलाकार यांनी एकापेक्षा एक अप्रतिम अशी सदाबहार गाणी श्रोत्यांसमोर सादर केली. वादक म्हणून शांताराम दयाळ, सुजित गायकवाड, अक्षता शेवडे यांनी आपली कामगिरी उत्तम प्रकारे बजावली. कार्यक्रमाचे संगीत संयोजन व ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे यांनी केली. राजेंद्र आफळे यांनी कार्यक्रमाचे निवेदन उत्कृष्ट प्रकारे केले. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका पाटील म्हणाले, “मानवाचे जीवनच गाणे झाले आहे. दिवाळी पहाट ही पुण्यासारख्या शहरांमध्ये असलेल्या कल्पनेला साताऱ्यामध्ये मूर्त स्वरूप देण्याचे काम शिरीष चिटणीस यांनी केले आहे. त्यामुळेच हौशी कलाकारांना दालन उपलब्ध होत असून चांगली गाणी लोकापर्यंत पोहोचत आहेत. दिवाळी पहाट ही संकल्पना पुण्या-मुंबईत जरी रुजलेली असली तरी सातारा ही त्या बाबतीत काही मागे नाही.” असे स्पष्ट करीत संगीतामध्ये प्रचंड ताकद आहे.गाणी आपणाला जगायला शिकवतात. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व शिरीष चिटणीस यांच्या माध्यमातून गेली १५ वर्ष शाहूपुरी येथे हा दिवाळी पहाट कार्यक्रम होत आहे. मी पहिल्यांदाच या कार्यक्रमाला आलेलो आहे. परंतु कार्यक्रम बघितल्यानंतर आश्चर्यचकित झालो आहे.अशेही काका पाटील यांनी विविध उदाहरनाद्वारे स्पष्ट केले.सचिन शेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगला कार्यक्रम झालेला आहे. शाहूपुरीतील काही निवडक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. चांगले कार्यक्रम साताऱ्यात व्हावेत. ही शिरीष चिटणीस यांची भावना आहे.
कराओंके ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा संगीताचा कार्यक्रम सतत सुरू असतो. त्याही कार्यक्रमाला जायचा योग येतो. परंतु आजचे हे कलाकार बघितले तर मला विशेष आनंद होतोय. हे सर्व आपल्या साताऱ्यातील कलाकार आहेत.
संस्थेचे संस्थापक -चेअरमन शिरीष चिटणीस म्हणाले, संस्था गेली १५ वर्षे झाली दिवाळी पहाट हा सामाजिक कार्यक्रम राबवित आहे.हा उपक्रम शाहूपुरी वासीयांचा जिव्हाळ्याचा व आपुलकीचा वाटतो. सदरच्या कार्यक्रमास ठेवीदार, सभासद, हितचिंतक व ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.शिवाय, संस्था वाढीस हातभार लाभत आहे. सदर प्रसंगी “कंठी शोभे साज स्वरांचा, पैंजण पायी ताल लयींचे, मनगाभारा भरून जाण्या,शिंपण होई आज सुरांचे.”.. या सुंदर चारोळीने चिटणीस यांनी मंगलमय शुभेच्छा दिल्या.
सदरच्या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेखा रानडे, संचालक अनिल चिटणीस, भगवान नारकर, लालासो. बागवान,आप्पासो शालगर, सौ.शिल्पा चिटणीस, प्रदीप देशपांडे, हणमंत खुडे, प्रदीप लोहार, जगदीश खंडागळे, सुनील बल्लाळ, श्रीकांत कात्रे,सुरेश चिंचकर, सागर पावसे,प्राचार्य वि.ना.लांडगे, डॉ.शाम बडवे, मधुकर शेंबडे,व्यवस्थापक विनायक भोसले, शाखाधिकारी रवींद्र कळसकर, सुनील बंबाडे, अभिनंदन मोरे, आग्नेश शिंदे, लक्ष्मण कदम, सागर पोगाडे, अभिजीत देवरे, जनार्दन निपाने, अनिल मसुरकर, विनोद कामतेकर, सचिन शिंदे, शुभम बल्लाळ, प्रवीण सपकाळ, रविराज जाधव व सर्व पिग्मी एजंट उपस्थित होते.
फोटो : दिवाळी पहाट कार्यक्रमात गीत सादर करताना कलाकार.(छाया-अनिल वीर)