‘दिवाळी हाट’ खरेदीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

नागरिकांच्या आग्रहास्तव सोमवारी सुद्धा सुरु राहणार

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील स्थानिक महिला बचत गट व गृह उद्योगांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या दिवाळी फराळ तसेच दिवाळी सणासाठी आवश्यक असणाऱ्या  वस्तू एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात दोन दिवस सुरु करण्यात आलेल्या कोपरगाव ‘दिवाळी हाट’ ला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आग्रहास्तव एक दिवस वाढविण्यात आला असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली आहे

जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील स्थानिक महिला बचत गट व गृह उद्योगांनी तयार केलेल्या आकाश कंदील, पणती, रांगोळी, सुगंधी तेल, दिवाळीचा तयार फराळ, सुंगंधी अगरबत्ती, मेणबत्ती, लक्ष्मी पूजन आदी साहित्य नागरिकांना वाजवी दरात मिळावे यासाठी शनिवार (दि.१५) व रविवार (दि.१६) या दोन दिवस ‘दिवाळी हाट’ चे आयोजन करण्यात आले आहे. पाहिल्या दिवशी नागरिकांचा मिळालेला उस्त्फुर्त प्रतिसाद व दुसऱ्या दिवशी देखील त्याच्या दुप्पट प्रतिसाद नागरिकांनी दिला व खरेदीसाठी मोठीं गर्दी केली त्यामुळे अजून एक दिवस ‘दिवाळी हाट’ सुरु ठेवावा अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यामुळे नागरिकांच्या मागणीचा विचार करून सोमवार (दि.१७) रोजी सुद्धा ‘दिवाळी हाट’ सुरु राहणार असल्याचे सौ. पुष्पाताई काळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे सोमवारी सुद्धा नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here