‘दिवाळी हाट’ खरेदी साठी सुवर्ण संधी – सौ. पुष्पाताई काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी असणाऱ्या वस्तूंची स्थानिक महिला बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ‘दिवाळी हाट’ सुवर्णसंधी असून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे.

 प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील स्थानिक महिला बचत गट व गृह उद्योगांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या दिवाळी फराळ तसेच दिवाळी सणासाठी आवश्यक असणाऱ्या  वस्तू एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या ‘कोपरगाव दिवाळी हाट’ चे उदघाटन सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, मागील दोन वर्ष सर्वच सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट असल्यामुळे काहीसा निरुत्साह होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे येणारा दिवाळीचा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा होणार असून दोन वर्षानंतर मोठी आर्थिक उलाढाल बाजारपेठेत होणार आहे. त्याचा फायदा आर्थिक अडचणीत असलेल्या बचत गटाच्या महिलांना मिळावा व नागरिकांना देखील चांगल्या दर्जाच्या वस्तू वाजवी दरात मिळाव्यात यासाठी शनिवार व रविवार या दोन दिवस ‘कोपरगाव दिवाळी हाट’ चे आयोजन करण्यात आले आहे. कोपरगाव शहर व तालुक्यातील बचत गट व गृहोद्योग चालवण्याऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांनी आपली उच्च दर्जाची उत्कृष्ट उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. नागरिकांना एकाच छताखाली दिवाळीची सर्व खरेदी करण्याची सुवर्णसंधी असून आज व उद्या जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन मा.सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे.

यावेळी सौ. मिताली लोंगाणी, सौ. जल्पा व्यास, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा व माजी नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा गंगूले, सौ. माधवी वाकचौरे, सौ. मायादेवी खरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ. स्वप्नजा वाबळे, सौ. नेत्रा कुलकर्णी, सौ. उमा वहाडणे, सौ. रमा पहाडे, सौ.मनिषा विसपुते, सौ. देवयानी सरवैय्या, सौ.भावना रावल, सौ.सीमा पानगव्हाणे, सौ.वंदना चिकटे, सौ.संगिता मालकर, सौ.भाग्यश्री बोरुडे, सौ.शितल लोंढे, सौ.शैला लावर, सौ.निशा गवारे, सौ.बेबीआपा पठाण, सौ.सिमा बडजाते, सौ.सिमरन खुबाणी, सौ.महिमा ठोळे, सौ.शालिनी खुबाणी, सौ.उषा वाबळे, सौ.कल्याणी बनसोडे, सौ.रमा झंवर, आदींसह माजी नगरसेवक फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, अशोक आव्हाटे, ऋषिकेश खैरनार आदींसह प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या, बचत गट व गृहोद्योग व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ-‘कोपरगाव दिवाळी हाट’ चे उदघाटन प्रसंगी सौ. पुष्पाताई काळे समवेत मान्यवर