खरेदी केलेला सर्व माल विकेल का नाही?व्यापारी चिंताग्रस्त!
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
दिवाळी सण मोठा,आनंदाला नाही तोटा असे आपण नेहमी म्हणतो आणी ऐकतो मात्र गेल्या दोन वर्षात दिवाळी सणाचा आंनद घेता आला नाही किमान यवर्षी आनंदात दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजा व सामन्य माणसाला या दिवाळीचा आंनद घेणे अवघड झाल्याचे चित्र दिसत आहे तर यंदा बाजारपेठेत गर्दी फुलेल या आशेवर मोठ्या प्रमाणात माल भरलेल्या व्यापारी बांधवाना ही सतत वाढत आसलेली महागाई,ऑनलाईन खरेदीचे फ्याड चा सामना करतानाच पुन्हा अतिवृष्टीने केलेला कहर यामुळे आणलेला माल विकेल की नाही याची चिंता वाटू लागली आहे.
गेले दोन वर्ष कोरोनाच्या संकटाने दिवाळी सणाचा आंनद घेता आला नाही,मात्र यावर्षी गेल्या दोन वर्षाचा बॅक लॉग भरून काढायचा असा निश्चियच् यावर्षी सर्वांनी करून त्यादृष्टीने मनसुबे आखले.निर्बंध मुक्त दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याआधीच बळीराजाला अस्मानी संकटाने पुरतं हतबल केलं. हाती आलेलं पिक लगबगीने बाजारला नेऊन दिवाळी साजरी करण्याचे स्वप्नावर अक्षरशा पाणी फिरले.
बाजरपेठेत गर्दी होईल,दोन वर्ष संधी न मिळाली नाही म्हणून लोक यवर्षी चांगली खरेदी करतील या आशेवर दिवाळी साठी लागणाऱ्या विविध वस्तूच्या व्यापारी बांधवानी मोठ्या प्रमाणात माल भरला. आधीच सतत वाढत आलेली महागाई,लोकांचे ऑनलाईन खेरेदीचे फ्याड याचा सामना करता करता आता अतिवृष्टी मुळे बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात मंदी जाणवत आहे. खरेदी केलेला माल विकेल की नाही याची चिंता व्यापऱ्यांना वाटू लागली आहे.
चौकट –
दुवसेंदिवस वाढत्या महागईने सामन्य जनतेचे कमबरडे मोडले आहे तरी देखील वर्षाचा मोठा सण म्हणून
दिवाळी सणाची आतुरते ने वाट पाहत असतानाचं शेतकरी राजाचे अतोनात नुकसान झाले.मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाने शेतकरी व शेतमजूर यांची केवळ पिके वाहून गेली नाही त्यासोबत पूजेचे ताट,लेकरांचे कपडे, फटाके, मिठाई,आईची साडी,बापाचे धोतर सुद्धा वाहून गेले. शेतकरी व शेतमाजुरांची अंत्यत वाईट अवस्था आहे.या पेक्षा कोरोना काळातली दिवाळी बरी होती का असा प्रश्न पडला आहे.आनंदाच्या शिधा मुळे दिवाळी आनंदात जाईल हा भ्रम आहे.लख्ख दिव्यांचा सण असणारी ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून स्मरणात राहील.
—-कॉम्रेड श्रीमती मदिना शेख
चौकट-
गेली दोन वर्ष कोरांना मुळे दिवाळी साजरी करता आली नाही म्हणून लोक या वर्षीची दिवाळी मोठया उत्साहात साजरी करतील हे गृहीत धरून आम्ही दरवर्षी पेक्षा अधिक मालाची खरेदी केली, गत वर्षाच्या तुलनेत फटक्याच्या दरात चाळीस टक्क्या पर्यंत वाढ झाली आहे. तरीही लोक दिवाळी उत्सहाने साजरी करतील व फटक्यांची विक्री होईल असा अंदाज होता मात्र अंदाज सपशेल चुकला.यवर्षी फाटक्याच्या मागणीला अल्प प्रतिसाद मिळत आहे.मोठ्या प्रमाणात खरेदी केलेला माल विकेल की नाही याची चिन्ता माझ्या सह सर्व फटाके विक्रेत्यांना लागली आहे.
राजेंद्र उंडे(फाटके विक्रेते)
चौकट –
दरवर्षी प्रमाणे कपडाच्या होलसेल खरेदी दारात दहा ते पंधरा टक्के वाढ झाली तरी लोक खरेदी करतील अशी आशा होती.बहुतांशी नोकर वर्ग हा शहरी भागात जाऊन खरेदी करतो तर काही ऑनलाईन खरेदी करतात मात्र शेतकरी बांधव हा गावातच खरेदी करतो तोच आमचा खरा ग्राहक आहे.अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्याचा परिणाम झाला.दरवर्षीच्या तुलनेत केवळ पन्नास टक्के ग्राहक आहेत.
—मनोज गादीया (कापड व्यापारी)
चौकट –
दिवाळीचा सण हा दिव्यांचा सण आहे तसाच मिठाई व फराळाचा सण आहे.इतर एखादी गोष्ट कमी असेल तरी चालेल पण घरात गोड धोड असेल किंवा फराळाचे पदार्थ असतील ते बनवन्यासाठी किराणा माल ही अत्यवश्यक बाब असल्याने किराणा माल विक्रीवर मंदीचा अथवा वाढत्या महागाईचा फारसा परिणाम जाणवला नाही.दरवर्षीच्या तुलनेत किराणा माला चे भावात दहा ते पंधरा टक्के वाढ झाली लोक किराणा माल खरेदी करत आहेत.
—जितेंद्र कटारिया(किराणा व्यापारी)