देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगर पालिका कामगार पत संस्थेच्या वतीने कामगार सभासदांना 15 टक्के लाभांश तर 10 टक्के रिबेट असे एकुण 22 लाख 29 हजार 233 रुपये संस्थेच्या 75 सभासदांना मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते वापट करण्यात आले.
देवळाली प्रवरा नगर पालिका कामगाराची ञिंबकराज सेवकांची पत संस्था सभासदांना 31मार्च अखेर शेअर्स अनामत रक्कमेवर 15 टक्के, संचित ठेव रक्कमेवर 11 टक्के, मासिक ठेव रक्कमेवर 11 टक्के,व्याज रिबेट 10 टक्के संस्थेने कामगारांना 3 कोटी 14 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले होते.कर्जावरील व्याज भरणा 46 लाख 28 हजार 802 रुपये आला होता.त्यावर 10 टक्के प्रमाणे 4 लाख 62 हजार 880 रुपये रिबेट व लाभांश मिळून 22 लाख 29 हजार 233 रुपये संस्थेच्या 75 सभासदांना वापट कण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव शेटे,राजेंद्र चव्हाण,विजय साठे,सारंगधर टिक्कल,अंबादास अटक,सुरेश मोटे,अशोक जाधव, कृष्णा महांकाळ,मुन्ना कांबळे,राजेंद्र पोकळे,अशोक पंडीत,नंदु शिरसाठ, संस्थेचे सचिव उत्तम मुसमाडे आदी उपस्थित होते.