देवळाली प्रवरा परिसरात अतिवृष्टी ; ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  

वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अतोनात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा हताश झाला आहे.

  देवळाली प्रवरा परिसरातील गवळी माळ येथील तळे पूर्ण भरल्याने सर्व देवळाली प्रवरा परिसरातील ओढे नाले तुडूंब भरून वाहत आहे. कदम वस्ती, देवगिरे वस्ती  भागात शेतकऱ्यांच्या शेतात, जनावरांच्या गोठ्यात व शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले आहे.

 देवळाली प्रवरा - गुहा रस्ता अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याने तेथील नागरिकांना घरा बाहेर पडणे अवघड बनले आहे.

देवळाली सह सर्व भागात  पाऊस झाल्याने गुहा, वडनेर, तांभेरे,गणेगाव येथील पाणी दुपारनंतर जास्त वाहत आल्याने अनेक पाझर तलाव फुटल्याने देवळाली गावात ओढ्याची क्षमता संपल्याने पाणी सरळ शेतात घुसून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

 गणेगाव येथून येणारे पाणी ज्या तलावात अडवले जाते ते गवळी माळ तळे कोणीतरी फोडल्याने तसेच  म्हाळसारी तळे फुटल्याने अरुण कदम यांचे उसाचे शेत अक्षरशः वाहून गेले. देवगिरे वस्ती येथील अनेक लोकांच्या घरात घुसल्याने मध्ये नुकसान झाले आहे

 देवळाली प्रवरा शहरातील शनी मंदिर परिसरातील ओढा वाहू लागल्याने शहरवासीयांनी पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान  शनी मंदिर ओढ्या लगत राहणाऱ्या नागरिकांत पाणी वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले असून देवळाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन व्यवस्थापन पथक मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here