‘देवेंद्र फडणवीस आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची हे नाही चालणार’ : उद्धव ठाकरे

0

मुंबई : गद्दारांना गद्दाराच म्हणणार !गद्दारांची मंत्रिपद काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का कायम राहील. शिवरायांची आणि माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो अमित शहा आणि आमच्यात बंद खोलीत अडीच – अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचे ठरले होते. मात्र ऐन वेळी पलटी मारणारे आता आम्हाला शिकवीत आहे, आम्ही हिंदुत्व सोडले म्हणणारे जीनांच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवणारे ,न बोलावता पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाणारे , दहशत वाद्यांशी संबंधित मुफ्ती महेबुबा सोबत सरकार बनवणाऱ्यानी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. अडीच वर्षे सत्तेत राहिले त्यावेळी काही बोलले नाही , त्यावेळी काय तुमच्या दाढीतले केस काय तोंडात जात होते काय ? तसेच कायदा काय तुम्हालाच कळतो काय ? ‘देवेंद्र फडणवीस आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची हे नाही चालणार’ असे म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे : –

 • *असा मेळावा फार क्वचित झाला आहे. ही आलेली गर्दी कोरडी नाही. मी किती बोलू शकेन माही नाही.
 • *डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिली नाही, पण मी तुमच्यासमोर नतमस्तक झालो.
 • *गद्दारांची मंत्रिपद काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का कायम राहील.
 • *इथं एकही माणून भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही.
 • *यावेळेचा रावण वेगळा आहे. आतापर्यंत 10 तोंडाचा होता. आता 50 खोक्यांचा खोकासूर, धोकसूर झाला आहे.
 • *मी दवाखान्यात असताना कटप्पाने माझा घात केला.
 • *शिंदे गटाला माझ्या तेजाचा शाप आहे.
 • *भाजपला धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली.
 • *मी शिवसेना पक्षप्रमुखपदी राहायचं की नाही ते शिवसैनिक ठरवणार.
 • *मी आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो, भाजप बरोबर अडिच वर्षांचा करार झाला होता.
 • *इतरांना बाजूला सारून याला आमदार केला. मंत्री केला. आता हा मुख्यमंत्री झाला तर आता शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं आहे. आहे का लायकी? तुम्ही स्वीकारणार का त्यांना पक्षप्रमुख म्हणून?
 • *देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे. त्यांना कायदा चांगला कळतो. पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणाले. पुन्हा आले आणि दीड दिवसांत विसर्जन झालं. परत उपमुख्यमंत्री म्हणून आले. कायद्याच्या चौकटीत बोला. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची?
 • *देवेंद्र फडणवीस कायदा तुम्हालाच कळतो असं नाही आम्हालाही कळतो.
 • *जर असा कायदा असेल तर आम्ही तो जाळून टाकू. तुमचा कायदा तुमच्या मांडीवर तुम्ही कुरवाळत बसा.
 • *पाकिस्तानमध्ये जिन्नांच्या थडग्यावर जाऊन नतमस्तक होणारे तुमचे नेते आहेत.
 • *भाजपकडून तर मला हिंदूत्व शिकायची गरजच नाही. पाकिस्तानमध्ये नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता केक खाणारा तुमचा नेता तुम्ही आम्हाला हिंदूत्व शिकवणार?
 • *गायीवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोला. आरएसएसचे होसबाळे यांचे मी जाहीर अभिनंदन करतो. वाढती महागाई, बेकारी यावर त्यांनी आरसा दाखवला आहे. मोदी जेव्हा 5G च्या कार्यक्रमात कौतुक करत होते. तेव्हा होसबाळे त्यांना आरसा दाखवला.
 • *सर्व हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपिठावर यावं. मी माझं हिंदुत्व सांगतो, त्यांनी त्यांचं सांगावं.
 • *अतिरेकी राम राम राम जपून पळणार नाही.
 • *ही बाप चोरणारी औलाद आहे. स्वतः च्या बापाला काय वाटत असेल की त्यांच्याऐवजी दुसर्‍याचं नाव वापरतात. स्वतःच्या बापाच्या नावावर मतं मागा.
 • *तिकडे खूप ग्लिसरीनच्या बाटल्या गेल्या आहेत. सगळ देऊनही रडगाणं…
 • *अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत? या राज्यामध्ये जा, त्या राज्यामध्ये जा… इकडे काड्या घाला, तिकडचं सरकार पाडा… पाकव्याप्त *काश्मीरची एक इंच जमिन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. कशाला पाहीजेत गद्दार…
 • *अमित शहा आम्हाला जमीन दाखवा, पण ती पाकव्यप्त काश्मीरमधली दाखवा.
 • *मिंधे सरकार झुकलेलं आहे. पुष्पा पिक्चर आला होता ना… झुकेगा नही साला… तसं यांचं उलटं आहे. उठेगा नही साला…. यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण होतायेत. त्यातले 90 दिवस दिल्लीत गेले असतील. दिल्लीत मुजरा गल्लीत गोंधळ.
 • *देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहेत. मोहन भागवत मधल्या काळात मशीदीत गेले होते. कशाला गेले होते? हिंदुत्व सोडलं? ते गेले तर त्यांचं राष्ट्रकार्य आणि आम्ही कॉंग्रेससोबत गेलो तर हिंदूत्व सोडलं?
 • *भाजपचं स्क्रिप्ट न घेता शिंदेंनी भाषण करून दाखवावं.
 • *पाच वर्षांत हे अशोक चव्हाणांना जाऊन कसे भेटले होते याचा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहेच.
 • *काँग्रेस- राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवलं.
 • *जर तुम्ही साथ दिली तर मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here