धम्मकार्यासाठी एक झालेच पाहिजे : व्ही.आर.थोरवडे

0

सातारा : नावात काय आहे ? या शेक्सपिअरच्या म्हणण्यानुसार पदापेक्षा निरंतर समाजसेवा करणे अतिउत्तम असते.तेव्हा मानवाने कायमस्वरूपी धम्म कार्यासाठी एक झालेच पाहिजे. असे प्रतिपादन व्ही.आर.थोरवडे यांनी केले. 

   वाठार-किरोली,ता.कोरेगाव येथे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बंधुत्व जीवनगौरव विजेते अनिल कांबळे यांच्या मातोश्री गीताबाई शंकर कांबळे व चि. अमित यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजीत केलेल्या आदरांजली कार्यक्रमात थोरवडेसाहेब मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी सातारा पश्चिम जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव होते.व्ही.आर.थोरवडे म्हणाले, “धम्म मला वयाच्या ५० व्या वर्षी समजला.अधिकारी पदावर नोकरी करीत असताही केंद्रीय सचिव म्हणुन काम केले होते. तद्नंतरही सातारा जिल्हाध्यक्ष पदावर सर्वांच्या सहकार्याने काम धम्म वाढविण्यासाठी केलेले आहे. जिल्ह्यात महाविहार बांधण्यासाठी महाकाय काम हाती घेतले आहे.अजुनही उर्वरित काम करण्यासाठी सामुदायिक संघटन मजबूत झाले पाहिजे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात टीमवर्क म्हणुन नवनिर्वाचित कार्यकारिणी काम करीत आहे.वीरसर यांनी म्हटल्याप्रमाणे,कोण्ही कुठेही काम करावे.मात्र,धम्म कार्यासाठी एकत्रीत आले पाहिजे.आपले बोलणे,चालणे,वागणे,लिहिणे आदीमधून आपला स्वभाव समजतो. तेव्हा धम्माचे आचरण करूनच मानवासारखे एकमेकांशी व्यवहार करावा.”

   यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभाग उपाध्यक्ष नंदकुमार काळे, तालुकाध्यक्ष आबासाहेब दनाने (सातारा),तात्या गाडे(जावली) व  बी.जे.माने (कराड), नलिनीताई बैले, रिपब्लिकन सेना पूर्व जिल्हा महासचिव सुनील कदम व कोरेगाव तालुकाध्यक्ष भाऊ मोहड, साहित्यिक प्रकाश काशीळकर,यशवंत (आप्पा) अडसुळे, अनिल वीर,संदेश कांबळे,महिला उपाध्यक्षा शर्मिला आवडे,अमोल गायकवाड, डॉ. गंगावणे आदींनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केली.सदरच्या कार्यक्रमास जिल्ह्यातील मान्यवर, द्राक्षा खंडकर,शोभा भंडारे,सौ.कल्पना कांबळे, ठोमसेचे शिलवंत द्वयी, विविध क्षेत्रातील मान्यवर, न्यू पंचशील तरुण मित्र मंडळ वाठार – किरोली अध्यक्ष व कार्यकारणी आदी उपासक – उपासिका उपस्थित मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

फोटो : आदरांजली अर्पण करताना व्ही.आर.थोरवडे, पदाधिकारी,मान्यवर व कार्यकर्ते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here