
सातारा : ज्योतसे ज्योत जगाओ…या न्यायाने धम्म कार्य निरंतर चालु आहे.बुद्धांनी सांगीतलेला मध्यममार्ग मानवजातीचा उत्कर्ष करीत आहे.असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष तथा बंधुत्व धम्मरत्न पुरस्कार विजेते मिलिंद कांबळे यांनी केले.
तारळे,ता.पाटण येथे भारतीय बौद्ध महासभा व विभाग बौध्द विकास सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास सांगता समारंभ संपन्न झाला.तेव्हा मिलिंद कांबळे यांनी धम्मदेसना दिली.अध्यक्षस्थानी ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते मधुकर जगधनी होते.यावेळी महासभेचे तालुका सचिव रुपेश सावंत, मिलिंदबापू कांबळे,दगडू तांदळे व बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांची प्रमुख उपस्थिती होती. मिलिंद कांबळे म्हणाले, “कोणत्याही प्रकारचा मतभेद ठेवू नये.धम्म हा अथांग महासागरासारखा आहे.तेव्हा संकुचित दृष्टिकोन कोण्हीही न ठेवता सकारात्मक व विशालदृष्टिकोणातून सांघिक वाटचाल करूया.” महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे किशोर धरपडे म्हणाले, “विज्ञानावर आधारित धम्म असल्याने कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा असता कामा नये. वडीधारांचा आदरभाव राखावा. महामानवांच्या विचाराने युवकांनी वाटचाल करावी.”
केंद्रीय शिक्षिका कमल कांबळे म्हणाल्या, “वर्षावास काळातच धम्म प्रबोधन झाले पाहिजे. असे नाही तर धम्माची गाथा वर्षभर चालली पाहिजे.धम्मचळवळीत महिला येत आहेत.त्यांना प्रोत्साहन देण्याची भावना समाजात असलीच पाहिजे.”
मधुकर जगधनी म्हणाले, “तारळे भागात धम्मकार्य वाढत आहे.तेव्हा प्रत्येक गावा-गावात सच्चा अनुयायी निर्माण होणे काळाची गरज आहे.”
मुख्याध्यापक विजय भंडारे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक सुनील माने यांनी सूत्रसंचालन केले.बौद्धाचार्य विजय आ.भंडारे (बांबवडे) व आनंदा भंडारे यांनी विधी पार पाडला.मान्यवरांच्या हस्ते महापुरुष यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सदरच्या कार्यक्रमास राहुल रोकडे,शंकर भिसे,राजेंद्र सावंत,धनाजी कांबळे, सोपान भिसे, मधुकर भिसे, आप्पासाहेब भंडारे, वसंत कांबळे, संजय सावंत, काशिनाथ भंडारे, रुपेश जगधनी,रंजन जगधनी,ओमकार सावंत, नवनाथ सावंत, आदित्य कांबळे,बापु जगधनी, भास्कर भिसे, विकास जगधनी, वसंत सरगडे, शुभांगी जगधनी,पियांका जगधनी,सुरेखा जगधनी,छाया सरगडे,रंजना जगधनी,सुजाता जगधनी,रेखा जगधनी,अर्चना जगधनी,ईलसाबाई सरगडे, अडसुळेताई,रेखा देटके,तालुका व विभागातील मान्यवर, उपासक – उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.
फोटो : वर्षावास सांगता समारोहप्रसंगी अभिवादन करताना मान्यवर.