पैठण,दिं.३: पैठण तालुक्यातील मुधलवाडी ग्रामपंचायत येथे कारपे संस्था व मॅक्ट्रिक्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने म्हाडा कॉलनीची स्वछता क्वीन हा इव्हेंट कार्यक्रम घेण्यात आला.
कारपे समन्वय सुरेश घोरपडे यांनी महिलांना मिक्स कचऱ्याचे व उघड्यावर कचरा फेकण्याचे दुष्मपरिणामासह मॅक्ट्रिक्स व कारपे संस्थेबद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी टोकन पद्धातीने लक्की ड्रॉ घेण्यात आला यामध्ये ज्या महिलांना नंबर चे टोकन निघाले त्या 20 महिलांना स्पर्धे मध्ये सहभागी करून घेण्यात आले, कार्यक्रमा मध्ये महिलांनी खुप उत्साहात सहभाग नोंदवला, कार्यक्रमामध्ये 3 राऊंड घेण्यात आले.यात राईस गेम (वर्गीकरण) 20 सेकंदांचा टाईम देण्यात आला होता (कॉलर बॉल गेम) डस्ट बिन मध्ये कॉलर नुसार बॉल टाकणे वेळ-20 सेकंद,रॅपिड फायर राऊंड वेळ 10 सेकंद (कचऱ्या बद्दल प्रश्न )यां राऊंड मध्ये स्पर्धाकाना काही प्रश्न विचारण्यात आले या द्वारे महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
आपल्या गावातील उद्यड्यावर पडणारा मिक्स कचऱ्यामुळे आणि ते जनावरांनी खाल्ले तर त्यांच्यावर होणारे दुषपरिणाम असे विविध दुषपरिणाम महिलांना सांगण्यात आले आणि आपला परिसराची स्वछतेची जवाबदारी आपल्या सर्वांची आहे हे सांगण्यात आले तर रॅपिड फायर राऊंड मध्ये ओला कचरा खत निर्मिती चे फायदे व प्रकार सांगण्यात आले व स्वच्छते विषयी महिलांना प्रश्न विचारून योग्य उत्तर देणाऱ्या महिलांना तात्काळ बक्षिसे देण्यात आले यावेळी विजेत्या स्पर्धक प्रथम क्रमांक – कोमल उद्धव घायवाट, द्वितीय क्रमांक – प्रियंका गोरख जाधव, तृतीय क्रमांक – कविता कांबळे,उत्तेजनार्थ – कमलबाई हिवराळे यांना मॅक्ट्रिक्स कपंनीचे अझर पठाण, कलीम इनामदार, सरपंच काकासाहेब बर्वे ,उपसरपंच मदन पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सरपंच काकासाहेब बर्वे, उपसरपंच कैलास मदन पाटील, ग्रामपंचायत सदस्य भरत मुकुटमल,मॅक्ट्रिक्स कपंनीचे अजर पठाण ,कलीम इनामदार,
ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब बोरुडे,भाऊसाहेब जाधव
कारपे समन्वयक सुरेश घोरपडे, आम्रपाली डोंगरे, धिरज कोटवाल, संदेश घुले, बुद्धभूषण साळवे उपस्थित होते.
———-
फोटो : पैठण : विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देताना मॅट्रीक्स कंपनीचे कलीम इनामदार सह आदी.(छायाचित्र : विनायक मोकासे, पैठण)