नवरात्रौत्सव शांततेत साजरा करा – सूनिल पाटील.

0

उरण दि. 22 (विठ्ठल ममताबादे ) : सोमवार दि 26/9/2022 रोजी घटस्थापना आहे.या दिवसापासुन नवरात्रौत्सवाला सुरवात होणार आहे. हा नवरात्रौत्सव नउ दिवस चालणार असल्याने या नवरात्रौत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये यासाठी उरण तालुक्यातील नवरात्रौत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना सुचना देण्यासाठी व् मार्गदर्शन करण्यासाठी उरण पोलिस स्टेशनच्या माध्यमातून दिनांक 22/09/2022 रोजी 16:25 ते 17:35 या वेळेत उरण पोलीस ठाणे समोरील कोकण ज्ञान विद्यापीठ महाविद्यालय, उरण शहर येथे नवरात्रौत्सव-2022 निमित्त उरण पोलीस ठाणे हददीतील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता कमिटी, पोलीस पाटील यांची एकत्रितपणे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत उपस्थितांना उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी खालीप्रमाणे सूचना दिल्या :-

1) मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश व नगरपालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत तसे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावे.

2) सार्वजनिक दुर्गा मुर्तीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी कोणताही आक्षेपार्ह देखावा नसावा

3)नवरात्रौत्सव ठिकाणी जातीय/धार्मिक भावना भडकून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आक्षेपार्ह बॅनर,पोस्टर्स, देखावा किंवा फलक नसावा. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे रेकाॅर्डस्/गाणी वाजविण्यात येवू नयेत.

4) नवरात्रौत्सव मंडळ परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नियंत्रण ठेवण्यासाठी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे लावण्यात यावेत. महीला व पुरूष यांना दर्शनासाठी वेगवेगळया रांगेत दर्शनाची सोय करावी.

5) नवरात्रौत्सव साजरा करीत असलेल्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगात आणण्यासाठी जनरेटर, फायर फायटर, इत्यादी अत्यावश्यक साधनसामुग्री ठेवण्यात यावी.

6) नवरात्रौत्सवानिमित्त सार्वजनिक रस्त्यावर/चौकामध्ये/स्थानिक स्वराज्य संस्थांचे जागेवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे व विद्रुप करणारे फ्लेक्स/बोर्डस्/बॅनर्स इत्यादी उभारण्यात येवू नये.

7) विसर्जनावेळी नदी पत्रात ज्यांना पोहोता येत नाही अशांना नदी पात्रात उतरू देऊ नका. त्यांच्याऐवजी स्वयंसेवक यांच्या मार्फत देवी मूर्तीचे विसर्जन करून घेणे.

नवरात्रौत्सव सणाचे अनुषंगाने इतर महत्वाच्या सुचना देवून मार्गदर्शन करण्यात आले. आयोजित बैठकी करीता सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ पदाधिकारि व शांतता कमिटीचे, पोलीस पाटील असे एकुण 50 ते 55 पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here