पाणजे गावातील अक्कादेवी मंदिरात भाविक भक्तांची गर्दी.
उरण दि 28(विठ्ठल ममताबादे )
उरणचे उत्तरेकडील शेवटचं टोक पाणजे गाव.एका बाजूला समुद्र तर एका बाजूला गर्द जंगल.त्या वेळी ह्या भागात वाघाची खूप दहशत होती.देवीचे स्थान गावाच्या बाहेर असल्यामुळे बाहेर निघणे धोक्याचे होते.त्या वेळचा भगत अंबाजी जेठ्या पाटील याला दृष्टान्त झाला की देवीने वाघाला मारून गावकऱ्यांचा रस्ता मोकळा केला.तो येऊन पाहतो तर खरच देवीच्या समोरच तोंड फिरवून वाघ मरुन पडलेला होता.
पूर्वी ह्या भागात मीठ व इतर सामानाची ने-आण करण्यासाठी शिडाची मचवी सात होती. त्या पैकी अंबरनाथ नावाचा मचवा 1947 साली तुफानात फसला व एक माणूस गमवता-गमवता वाचला तो अक्कादेवीच्या नवसाने तेव्हापासून अंबरनाथ मचवा वाल्यांनी पालखी चालु केली.देवीच्या मागच्या बाजूला काळभैरव आहे म्हणून देवीला त्याची बहिण अक्कादेवी म्हणतात. उरण तालुक्यातील पाणजे गावातील अक्कादेवी मंदिरात भाविक भक्तांची नेहमी गर्दी पाहावयास मिळते. वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक भक्त येथे दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी येत असतात.नवरात्रात ग्रामस्थांच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम येथे राबविले जातात.