नाशिक विभागीय मुख्याध्यापक कार्यशाळा पुर्वतयारी साठी सभा संपन्न

0

नाशिक : मुख्याध्यापक उद्बोधन शिबिर – नाशिक, जळगाव , अहमदनगर , धुळे, नंदुरबार . नाशिक विभागीय मुख्याध्यापक कार्यशाळा पुर्वतयारी साठी सभा नाशिक शिक शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या समवेत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व विविध संघटनाच्या प्रतिनिधी समवेत नासिक येथे भारत स्काऊट गाईड सभागृहत पार पडली .

या सभेत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्हातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांची एकत्रित कार्यशाळा शुक्रवार दि. 22 डिसेंबर 2023 रोजी ठीक अकरा वाजता जगदंबा एज्युकेशन सोसायटी बाभूळगाव (येवला ),तालुका येवला जि नाशिक येथे आयोजित करण्यात आलेली आहे .या कार्यशाळेसाठी राज्याचे शिक्षण सचिव, राज्याचे शिक्षण आयुक्त . सुरज मांढरे , शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी ,प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक गोसावी ,नासिक विभागाचे उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण ,पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे व पाचही जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत तसेच सायबर वेलनेस या विषयावरती तन्मय जोशी यांचेही व्याख्यान असणार आहे. अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन व नियोजनासाठी पुर्वतयारी सभा नुकतीच पार पडली . त्यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली . अनेक संघटनाचे प्रतिनिधीनी भाग घेतला . नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देशमुख यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन तयार करून केले.उत्तर महाराष्ट्रातील हे मोठे उद्बोधन शिबिर असून या शिबिरासाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी उपस्थित राहुन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन . शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे व नासिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनी केले आहे . शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, अडीअडचणी, आव्हाने,तसेच नवीन शैक्षणिक धोरण 2020, सायबर सिक्युरिटी बाबत विद्यार्थ्यांनी घ्यावयाची दक्षता,मुख्याध्यापक यांचे हक्क व जबाबदाऱ्या या महत्त्वपूर्ण विषयांवर व्याख्यान आयोजित केलेली आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रकाशक यांचे पुस्तक स्टॉल्स लावले जाणार आहे तरी सर्वांनी या व्याख्याने व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा या सह विचार सभेसाठी मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे , बी के शेवाळे, डॉक्टर अनिल माळी , बी के नागरे , डी एस ठाकरे श्री सुरेश घरटे , भागिनाथ घोटेकर, आर टी जाधव, सखाराम जाधव, सोमनाथ धात्रक, गोरख येवले, बाळासाहेब गांगुर्डे, गायकवाड सर येवला,सौ सुलेखा पाटील , दत्तात्रय सांगळे , एम डी काळे, बी .के अहिरे उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here