संगमनेर : काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा राज्याचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा बँक ही जिल्ह्याची आर्थिक कामधेनू ठरली असून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान त्यांच्या बँका खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. दरम्यान या योजने अंतर्गत संगमनेर तालुक्यात पहिल्या टप्प्यात ३५६१ सभासद पात्र ठरले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे यांनी दिली.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेल्या प्रोत्साहन पर अनुदानाबाबत अधिक माहिती देताना जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड कानवडे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा बँकेने कायम शेतकरी ,सभासद यांचे हित जोपासले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहन पर अनुदान म्हणून ५० हजार रुपये त्यांच्या बँके खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये तालुक्यातून १८६५१ सभासदांचे रेकॉर्ड अपलोड करण्यात आले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३५६१ सभासदांच्या खात्यावर त्यांच्या प्रोत्साहन पर अनुदानाची रक्कम जमा झाली आहे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा कर्ज परतफेडीमध्ये कायम अव्वल राहिला असून यामध्ये नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जास्त आहेत. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी सोलर पॅनल करता कमी व्याज दराने कर्ज देण्याचा निर्णयासोबतच २०२२- २३ या हंगामामध्ये सर्व प्रकारच्या पीक कर्ज रकमेमध्ये सरासरी एकरी दहा हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.या निर्णयाबद्दल बँकेचे अध्यक्ष ॲड उदयराव शेळके, ॲड माधवराव कानवडे, संचालक गणपतराव सांगळे व सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, वसुली अधिकारी उल्हास शिंदे, तालुका सचिव प्रकाश कडलग यांचे शेतकरी बांधवांमधून अभिनंदन होत आहे.
Home महाराष्ट्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम जमा...