डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती उत्साहात संपन्न.
जामखेड तालुका प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे सर्वसामान्यांसाठी शिक्षणाचे दारे खुली झाली. विद्यार्थ्यांनी आपली स्वप्न साकार करण्यासाठी अभ्यास करावा. नागेश व कन्या विद्यालयाचे साठ विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. गुणवत्तेच्या बाबतीत जामखेड तालुका संस्थेच्या उत्तर विभागात प्रथम आल्याबद्दल अभिनंदन केले. विद्यालयात वस्तीगृह व कॉलेज इमारतीचा व एक हजार क्षमतेचा मोठा हॉल बांधकामासाठी रयत शिक्षण संस्था व इतर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले . विद्यालयाचे प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. विद्यार्थ्यांबरोबर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. असे मनोगत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश संकुलामध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सकाळी भव्य कर्मवीराची भव्य मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली मिरवणुकीचे विशेष आकर्षण एनसीसी ध्वज पथक, मुलांचे लेझीम – झांज, पथक मुलींचे टिपरी लेझीम पथक, गुरुकुल वर्गाचे कर्मवीर दिंडी, रेबिन पथक, ढोल पथक व उत्कृष्ट सजवलेला कर्मवीर रथ हे होते. एक दोन तीन चार कर्मवीरांचा जय जय कार, रयतेचा राजा कर्मवीर माझा, रयत माऊली वटवृक्षाची सावली, रयत शिक्षण संस्थेचा विजय असो, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या घोषणेने संपूर्ण जामखेड शहर दुमदुमून निघाले.
जामखेड शहरात विविध ठिकाणी ग्रामस्थांनी कर्मवीर रथाचे पूजन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्जत जामखेडचे आ.व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रोहित पवार होते तर प्रमुख उपस्थिती तहसीलदार योगेश चंद्रे, र शि सं उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, उद्योजक आकाश बाफना, नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर, रा. कॉ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, भोसले एम के, कन्या विद्यालय स्कूल कमिटीचे प्रा मधुकर राळेभात , सुरेश भोसले ,प्रकाश सदाफुले, प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापिका चौधरी के डी, उपप्राचार्य तांबे ए एन , रा. कॉ. तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, डॉ. सागर शिंदे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अशोक यादव ,नानासाहेब मोरे, तांबे पी एन, युवक अध्यक्ष शरद शिंदे, महेश निमोणकर, नगरसेवक दिगंबर चव्हाण, नगरसेवक अमित जाधव , राजेंद्र गोरे, प्रा सुभाष फाळके, प्रा साळवे डी.एन. ,वैजीनाथ पोले, विनायक राऊत, कुंडल राळेभात,सुदाम मुरूमकर, उमर कुरेशी , अमोल गिरमे,दादा उगले,पर्यवेक्षक रघुनाथ मोहळकर, प्रकाश सोनवणे, प्रा कैलास वायकर,प्रा विनोद सासडकर ,रमेश बोलभट,संजय हजारे, सोमनाथ गर्जे, एनसीसी प्रमुख मयूर भोसले, सर्व नागेश व कन्या विद्यालय विद्यार्थी-विद्यार्थिनी पालक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नगरपरिषदेमार्फत घेतलेल्या निबंध चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण करण्यात आले तसेच डॉ.सागर शिंदे यांनी विद्यालयातील अकरा अनाथ विद्यार्थी शैक्षणिक दत्तक घेतले त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च गणवेश, दप्तर ,वह्या, शालेय साहित्य शैक्षणिक फी देतात. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते अनाथ विद्यार्थ्यांना साहित्य गणवेश वाटप करण्यात आले वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मडके बी.के. यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष ससाने, संभाजी इंगळे व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका चौधरी के. डी. यांनी केले.