परमपूज्य जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी  यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त पनवेल मध्ये गुरुवंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

0

वीरशैव लिंगायत समाज भवनासाठी पनवेल महानगर पालिका हद्दीत भूखंड उपलब्ध करून देण्याचे भाजपा युवा नेते तथा पनवेल महानगर पालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आश्वासन.

उरण दि. 21(विठ्ठल ममताबादे ) : वीरशैव लिंगायत समाजाचे धर्मगुरु,परमपूज्य, मौनतपस्वी श्री. म. नि. प्र. जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी, (वीरक्तमठ,निंबाळ,अर्जुनगी, समाधान, कलबुर्गी, सोलापूर, बागलकोट, विजयपूर, हुबळी, बेंगळूरू) यांच्या 80 व्या वाढदिवसा (अष्टदशमानोत्सव) निमित्त बुधवार दि. 21 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, शिवाजी चौक जवळ, जूना पनवेल, नवी मुंबई येथे भव्य असे गुरुवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाला लिंगायत समाजातील भाविक भक्तांचा मोठा उत्तम प्रतिसाद लाभला.

सकाळी 8 ते 9 या वेळेत इष्टलिंग धारण कार्यक्रम, 9 ते 10 शिवाजी चौक ते नाट्यगृह पर्यंत कुंभ व शोभा यात्रा, 10 ते दुपारी 1 या वेळेत परमपुज्य स्वामीजींचे गुरुवंदन व तुलाभार कार्यक्रम, दुपारी 1 ते 2 परमपुज्य महास्वामीजीचे दर्शन सोहळा व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम  यावेळी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.  पुज्य श्री म.घ.च संगमेश्वर शिवाचार्य महास्वामी पंचमठ गोग्गीहळी जि. शिवमोग्गा, पुज्य श्री म.घ. च. घनबसव अमरेश्वर शिवाचार्य महास्वामी हिरेमठ जडे जि. शिवमोग्गा, पूज्य श्री म. नि .प्र सदाशिव महास्वामीजी शिवलिंगेश्वर विरक्त मठ मूडी जि. हावेरी यांच्या पावन सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून नवी मुंबईचे शिल्पकार आ. गणेश नाईक,पनवेल महानगर पालिकच्या महापौर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकुर, विरोधी पक्षनेता प्रितम म्हात्रे, माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार,सोलापूरचे शिवव्याख्याते शिवरत्न शेटे,शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे महाराष्ट्र मुख्य संघटक नारायण कंकणवाडी, रायगड जिल्हा प्रमुख विनायक म्हमाणे, उद्योगपती शिवलिंगय्या शिवयोगीमठ, शरण संकुलचे जी. बी रामलिंगय्या यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबई सदभक्त मंडळी आणि शरण संकुल नवी मुंबई यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इष्टलिंग धारण व तुलाभार सेवा यावेळी करण्यात आले. यावेळी वीरशैव लिंगायत समाजा तर्फे वीरशैव लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर भवनासाठी तसेच ध्यानधारणासाठी पनवेल महानगर पालिकेत भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी शरण संकुल सोसायटीचे सह-सचिव आनंद गवी यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली.                                                                                                   कार्यक्रमावेळी उपस्थित असलेले परेश ठाकूर यांनी वीरशैव लिंगायत समाजासाठी पनवेल महानगर पालिका हद्दीत महात्मा बसवेश्वर भवन व ध्यानधारणासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या गुरूवंदन कार्यक्रमासाठी ठाणे, मुंबई, पालघर, रायगड परिसरातील लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमृत परमशेट्टी, रविंद्र अंटिन, भिमाशंकर बिराजदार, सूर्यकांत इंगळे, सुनील पाटील, जगदिशप्पा, विठोबा मेत्री, मंजुळा हिरेमठ, स्नेहा हळ्ळी, प्रकाश अवरनळ्ळी, प्रभावती बेल्वानकीमठ, आनंद गवी व इतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. विशेषतः यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.महिला आपल्या पारंपारिक इरकल साडी मध्ये कलश कुंभ शोभा यात्रेत सहभागी झालेल्या होत्या. अतिशय उत्साहात आणि प्रसन्न वातावरणात गुरूवंदनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here