परिपाठ/पंचाग/दिनविशेष 

0

 दिनांक:~ 28 सप्टेंबर 2022 *

       * वार ~ बुधवार *

          * आजचे पंचाग *

    ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*आश्विन. 28 सप्टेंबर*

     *तिथी : शु. तृतीया (बुध)*   

        *नक्षत्र : स्वाती,*

          *योग :– वैधृती*

     *करण : तैतील*

*सूर्योदय : 06:23, सूर्यास्त : 06:36,*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           * सुविचार *

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*करणी कसायची,बोलणी मानभावची.*

*अर्थ :- बोलने गोड गोड, आचरण मात्र निष्टुर.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

             * दिनविशेष *    

*🌍 जागतिक रेबीज दिन*

*🟢 Green Consumer Day*

*🌍 आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन*

*🌍 आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन*

*🌞या वर्षातील🌞 271 वा दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*१८३७: साली अंतिम भारतीय मुघल सम्राट बहादूर शहा द्वितीय दिल्ली येथील सम्राट बनले.*

*१९२४: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.*

*१९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला*

*१९३९: दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.*

*१९५८: साली फ्रांस देशांत संविधान आमलात आणण्यास मंजुरी देण्यात आली.*

*१९६०: माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश*

*१९९९: महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर*

*२०००: विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर*

*२००२: सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू तर ४ गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक व जमीन वर सुटका.*

*२००८: साली स्पेसएक्स कंपनीने बनविलेले फाल्कन 1 हे यान पृथ्वीच्या कक्षेत जाणारे पहिले खासगी-विकसित द्रव-इंधन प्रक्षेपण वाहन बनले.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*१८०३: प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)*

*१८९८: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार, हिंदू महसभेचे अध्यक्ष, देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला*

*१९०७: भगत सिंग – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)*

*१९०९: पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)*

*१९२५: अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ सेमूर क्रे यांचा जन्म.*

*१९२९: लता मंगेशकर – सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्‍न, दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण*

*१९६६: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म.*

*१९४७: शेख हसीना – बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान

*१९४९: साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी ४०वे सरन्यायाधीश राजेंद्रमल लोढा यांचा जन्मदिन.*

*१९८२: अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय*

*१९८२: रणबीर कपूर – अभिनेता*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*१८३७: साली भारतातील शेवटचे मुघल शासक बादशहा अकबर द्वितीय यांचे निधन.*

*१९८९: फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ११ सप्टेंबर १९१७)*

*१९९२: मेजर ग. स. ठोसर – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे*

*१९९४: भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन के. ए. थांगवेलू यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९१७)*

*२०००: श्रीधरपंत दाते – सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते*

*२००४: डॉ. मुल्कराज आनंद – लेखक (जन्म: १२ डिसेंबर १९०५)*

*२०१२: ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (जन्म: २९ सप्टेंबर १९२८)*

*२०१२: माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक (शोले, सीता और गीता, शान, रझिया सुलतान, सोहनी महिवाल, सागर, चमत्कार), फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले – १९७५) (जन्म: ?? ???? १९२९)*

*२०१५: साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी कवी, शैक्षणिक आणि पत्रकार वीरेन डंगवाल यांचे निधन.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

          *सामान्य ज्ञान *

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*शास्त्रीय भाषेत आवाजाला काय म्हणतात ?*

*ध्वनी

*वनस्पतींचे वर्गीकरण कोणत्या शास्त्रज्ञाने केले आहे ?* 

*कॅरोलस लिनिअस

*जागतिक तंबाखू प्रतिबंधक दिन केव्हा साजरा करतात ?*

*३१ मे

*क्रिकेट या खेळाचा प्रारंभ कोठे झाला ?*

*इंग्लंडमध्ये

*कोणत्या रक्तगटाला सार्वत्रिक रक्त दाता म्हणतात ?*

*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           * बोधकथा *

*🛠️जातीवंत इंजिनियर⚙️*

    खूप वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्‍य होते. माणसांनी खच्‍चून भरलेली एक रेल्‍वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्‍यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्‍यम उंचीचा हा मनुष्‍य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्‍याच्‍या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्‍यातील बहुतांश इंग्रज त्‍याची चेष्‍टामस्‍करी करत होते. त्‍याला खेडूत, अडाणी समजून त्‍याच्‍या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्‍यांच्‍या त्‍या चेष्‍टामस्‍करीकडे, टिंगल करण्‍याकडे त्‍या भारतीयाचे लक्ष नव्‍हते. तो त्‍याच्‍या नादात मग्‍न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्‍याने रेल्‍वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्‍काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्‍याला काहीबाही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्‍याने विचारले, “कोणी साखळी ओढून ही रेल्‍वे थांबविली”?  त्‍या सावऴया रंगाच्‍या व्‍यक्तिने उत्तर दिले,”मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्‍वे” गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्‍यक्ति उत्‍तरली,”माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्‍वे पट्ट्या खराब झाल्‍या आहेत.”

गार्डने विचारले,”हे तुला कसे कळले”ती व्‍यक्ति म्‍हणाली, “माझ्या अनुभवानुसार रेल्‍वेच्‍या गतीमध्‍ये काहीसा फरक पडला आहे आणि त्‍यामुळे रेल्‍वेचा जो विशिष्‍ट आवाज येतो तसा न येता तो वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज फक्त रेल्‍वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता.”  गार्डने याची खातरजमा करून बघण्‍यासाठी त्‍या व्‍यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एके ठिकाणी खरोखरीच रूळाच्‍या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्‍टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असतानाच रेल्‍वेत त्‍या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. केवळ त्‍या माणसाच्‍या ज्ञानामुळे आज त्‍यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्‍या माणसाची प्रशंसा व स्‍तुती करू लागले. गार्डने त्‍यांचे आभार मानले व विचारले, “सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय” त्‍या माणसाने शांतपणे उत्तर दिले, “माझे नाव डॉ. एम. विश्र्वेश्‍वरैय्या असून मी व्‍यवसायाने इंजिनियर आहे.” त्‍यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्‍तब्‍ध झाले. कारण त्‍याकाळात विश्र्वेश्‍वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्‍हणून ओळखत होता.*सहाजीकच टिंगल करणा-या लोकांनी त्‍यांची क्षमा मागितली.

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 *श्री. देशमुख. एस. बी

*सचिव*

*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*

*कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here