परीक्षा निकोप वातावरणात पार पाडाव्या : डॉ .शरद गोसावी

0

सिन्नर : दबावामुळे कॉपीमुक्त परीक्षा होणार नाही, विद्यार्थ्यांना कॉऊसलिंग करुन ,त्यांची मानसिकता बदलावी लागेल,एखाद्या विषयात विद्यार्थी कॉपी करतांना सापडला तरीही त्याला लगेच दूसरा पेपर द्यावा ,तो विद्यार्थी इतर विषयांचे पेपर देवून त्या विषयात पास होवू शकतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे अध्यक्ष डॉ .शरद गोसावी यांनी केले.

31जानेवारीला अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या सोबत सहविचार सभा राज्य मंडळ पुणे येथे झाली त्या सभेत ते बोलत होते.
सभेला राज्य सचिव अनुराधा ओक,राज्य सहसचिव माणिक बांगर,सह. सचिव जयश्री पराते,राज्य मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के.एस ढोमसे, प . महाराष्ट्राचे सचिव एस बी देशमुख, यांनी यावेळी मार्गदर्शन केले .

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी पुढे म्हणाले ज्या शाळेचे रोस्टर अद्ययावत आहे त्यांचे पवित्र पोर्टलवर जाहिराती येत आहेत. संस्था चालक,मुख्याध्यापक, परीक्षा मंडळ या सर्वांनी विद्यार्थ्याची परीक्षा घेणे जबाबदारी आहे. वर्ग 10 आणि 12 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षावर बहिष्कार घालणे योग्य नाही. आपण शाळेच्या इ . 5,6, 7, 8,9 च्या परीक्षांवर बहिष्कार घालत नाही ,मग 10 आणि 12 वी च्या परीक्षेवर बहिष्कार नको.परीक्षा वेळेवरच होईल, संघटणेने यावर विचार करावा.विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडेल असे काही करू नये. मुख्याध्यापकांना ,परीक्षकांचे काम देवू नये. वरिष्ठ परीक्षक असतील तर त्यांना राखीव ठेवावे.
शाळेनी लगतच्या 6 वर्षाची फी एकदाच भरली की त्या शाळेला मंडळाची कायम मान्यता देण्यात येइल.परीक्षा केंद्रावर विद्यार्थी सिमीत ठेवावे, जवळपास एखादी मोठी शाळा असेल तर त्या शाळेला परीक्षा केंद्र द्यावे. परीक्षकांचे वरिष्ठ समीक्षकांनी प्रशिक्षण द्यावे. सेंटरवर परीक्षेसाठी 80 टक्के ॲडव्हान्स दिले जाते. विद्यार्थ्यांना परीक्षा दरम्यान पाणी देणारा विद्यार्थी ठेवू नये .असेही राज्य अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नये , १ ते १० वी पर्यंत ट्युशन बंद केल्या तोच निर्णय ११वी १२वी साठी घ्यावा . शासनाकडे यंत्रणा कमी आहे . नियामक, सुपरवायझर ,केन्द्र संचालक यांच्या मानधनात १०% वाढ केली आहे .
यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार बारवकर ,राज्य सचिव अशोक मोरे, प .महाराष्ट्राचे सचिव एस बी देशमुख ,विद्या सचिव प्रविण दिवे,कोषाध्यक्ष विलास भारसाकळे,विदर्भ अध्यक्ष सतिश जगताप, दत्तात्रय कदम,राज्य प्रसिद्धी प्रमुख सज्जन पाटील, संघटक दत्ताजी कदम, मराठवाडा सचिव जे.एम.पैठणे.संजय शिप्पलकर, मोती भाऊ केंद्रे, धनंजय भांडवकर, आप्पासाहेब कळमकर, संजय यादव, सचिन काटे, शहाजी पाचोरे, कळमकर ए टी , सुदर्शन वाणी , डी जे भांडवलकर सहविचार सभेला उपस्थित होते. सुरुवातीला आलेल्या सर्व मान्यवरांनी आपला परिचय करून दिला. राज्य अध्यक्ष के.एम.ढोमसे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमणांनी स्वागत केले. राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सहविचार सभेची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here