परीपाठ/पंचाग/दिनविशेष 

0

*❂ दिनांक:~ 01 ऑक्टोंबर 2022 ❂*

        वार ~ शनिवार 

आजचे पंचाग 

   आश्विन. 01 ऑक्टोबर

   *तिथी : शु. षष्ठी (शनि)*   

  *नक्षत्र : ज्येष्ठा,*

  *योग :- आयुष्मान*

 *करण : कौलव*

*सूर्योदय : 06:24, सूर्यास्त : 06:34,*

सुविचार

खूप सारे उपदेश ऐकण्या पेक्षा, थोडासा सराव करणे कधीही चांगले.*

           म्हणी व अर्थ 

*अंथरूण पाहून पाय पसरावेत.* 

*अर्थ:- ऐपत पाहून खर्च करावा.*

           दिनविशेष   

*आंतरराष्ट्रीय कॉफी दिन*

*आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन*

*आंतरराष्ट्रीय संगीत दिन*

*१ आक्टोबर ते ७ आक्टोबर : वन्य जीव सप्ताह*

*या वर्षातील274 वा दिवस आहे.*      महत्त्वाच्या घटना 

*१९५३: साली भाषांवर आधारित भारतातील पहिले तेलगु भाषिक राज्य आंध्रप्रदेश राज्याची स्थापना करण्यात आली.*

*१९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.*

*१९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*

*१९६९: कॉनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले.*

*१९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.*

*१९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.*

*१९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले.*

*२००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.*

*२००५: इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.*

जन्मदिवस / जयंती

१८४७: अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्‌गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)*

*१८८१: विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)*

*१९०६: सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (मृत्यू: ३१ आक्टोबर १९७५)*

*१९१९: गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)*

*१९१९: मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९३) शायर, गीतकार आणि कवी (मृत्यू: २४ मे २०००)*

*१९२४: जिमी कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते*

*१९२८: विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (मृत्यू: २१ जुलै २००१)*

*१९३०: जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ – ७ आक्टोबर १९९९) (मृत्यू: १२ डिसेंबर २०००)*

*१९४५: साली भारतीय राजनीतिज्ञ व भारताचे विद्यमान १४ वे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा जन्मदिन.*

मृत्यू / पुण्यतिथी

१८६८: मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा (जन्म: १८ आक्टोबर १८०४)*

*१९३१: शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (जन्म: १८ जानेवारी १८८९)*

*१९५९: इटलीचे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)*

*१९९७: गुल मोहम्मद –जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१”) (जन्म: ?? १९६१) * सामान्य ज्ञान              *हंगामी पंतप्रधानपद भूषवणारी पहिली व्यक्ति कोण आहे ?*

*गुलझारीलाल नंदा*

*ख्रिचन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता ?*

*बायबल*

*मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली ?*

*चंद्रगुप्त मौर्य*

*पृथ्वीवर पाणी व जमीन यांचे वाटप कसे आहे ?*

*पाणी ७१ % जमीन २९ %*

*भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते आहे ?*

*द बेंगाल गॅझेट*

 *बोधकथा *

  आरसा

*एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’*

 *तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात.*

*देशमुख. एस. बी*

*सचिव*

 नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here