❂ दिनांक:~ 03 ऑक्टोंबर 2022 ❂*
*वार ~ सोमवार*
*आजचे पंचाग*
*आश्विन. 03 ऑक्टोबर*
*तिथी : शु. अष्टमी (सोम)*
*नक्षत्र : पुर्वाषाढा,*
*योग :- शोभन*
*करण : बव*
*सूर्योदय : 06:25, सूर्यास्त : 06:34,*
*सुविचार*
*स्वत:च्या तोंडाने खूप मोठेपण सांगून माणूस मोठा होत नसतो…!तो कसा आहे ते त्याच्या वागण्यावरून व कृतीवरून लोकांना दिसून येते असते…!*
*म्हणी व अर्थ*
*अति झाले अन् आसू आले.*
*अर्थ :- एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती सुखदायी ठरते.*
*दिनविशेष*
*या वर्षातील 276 वा दिवस आहे.*
*महत्त्वाच्या घटना*
*१६७०: शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली.*
*१७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.*
*१९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.*
*१९४२: साली जर्मनीने A 4 रॉकेट प्रक्षेपित केलं होत. मानवाद्वारे निर्मित अंतरिक्षात जाणारे हे पहिले यान होते.*
*१९५२: युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.*
*१९७७: साली भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कैद करण्यात आलं होत.*
*१९९५: ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.*
*जन्मदिवस / जयंती*
*१८९०: साली प्रसिद्ध भारतीय ओडिसी लेखक, कवी, पत्रकार समाजसेवक, सुधारक, इतिहासकार आणि राजकारणी डॉ. लक्ष्मीनारायण साहू यांचा जन्मदिन.*
*१९०३: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू: २२ जानेवारी १९७२)*
*१९०७: नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक आणि ‘मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास’ (मृत्यू: २ सप्टेंबर १९९०)*
*१९१४: म. वा. धोंड – टीकाकार (मृत्यू: ५ डिसेंबर २००७)*
*१९१९: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (मृत्यू: ९ जानेवारी २०१३)*
*१९२१: रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (मृत्यू: २३ जून १९९६)*
*१९४७: सबवे रेस्टॉरंट चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर २०१५)*
*१९४९: जे. पी. दत्ता – चित्रपट दिग्दर्शक*
*१९५३: साली प्रख्यात भारतीय सर्वोच्च न्यालायाचे माजी ४५ वे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा जन्मदिन.*
*२००७: सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविणारे रवींद्र पाटील यांचे टी. बी. रोगामुळे निधन.*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१८६७: एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक (जन्म: ९ जुलै १८१९)*
*१८९१: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२)*
*१९२३: साली भारतीय आणि दक्षिण आशियाई महिला चिकित्सक आणि सर्जन तसचं, भारतातील पहिल्या महिला पदवीधरांपैकी एक कादंबिनी गांगुली यांचे निधन.*
*१९५३: साली भारतीय कायदेपंडित व भारतीय संविधान समितीचे सदस्य दीवान बहादूर सर अल्लादी कृष्णास्वामी अय्यर यांचे निधन.*
*१९५९: दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक (जन्म: २२ सप्टेंबर १९०९)*
*१९६६: साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी मासिक ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ आणि ‘सत्यकथा’ इत्यादी मासिकांचे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन.*
*१९९९: अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (जन्म: २६ जानेवारी १९२१)*
*२०१२: भारतीय धर्मशास्त्रज्ञ आणि विद्वानअब्दुल हक अन्सारी यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९३१)*
*२०१२: केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर (जन्म: २४ आक्टोबर १९२६)*
*सामान्य ज्ञान*
*महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?*
*नागपुर*
*भारतीय नौसेनेचे जनक कोणास म्हटले जाते ?*
*छत्रपती शिवाजी महाराज*
*संत नामदेवाचे जन्मगाव कोणते आहे ?*
*नरसी*
*रत्नागिरी जिल्हा कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?*
*हापूस आंबा*
*अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?*
*सातारा*
*बोधकथा* *बुद्धीबळ*
*एक पंडित एकदा एका राजाकडे गेला व त्याला म्हणाला,”महाराज ! मी आवाहन करतो की या राज्यातील कोणीही माझ्याशी वादविवाद करावे. जर मी जिंकलो तर मला हजार होन द्यावे आणि मी हरलो तर मी राजाचा गुलाम म्हणून राहीन.” राजाने ते आवाहन स्वीकारले. वादसभा सुरु झाली, पंडित हा त्या राजाच्या जनतेपेक्षा खूप हुशार निघाला. त्याने सर्वाना हरविले. आता पंडिताला बक्षीस म्हणून हजार होन देण्याची वेळ आली तेंव्हा राजा म्हणाला,”पंडितजी! तुम्ही मला कुठे हरविले आहे? ” हे ऐकताच पंडित म्हणाला,”महाराज! आपण राजे, मी आपल्याला कसा काय हरविणार?” राजा म्हणाला,”अहो! मी कुठे तुम्हाला वादविवाद करायला सांगतो आहे. तुम्ही माझ्याशी बुद्धिबळ खेळा, जर तुम्ही जिंकलात तर दोन हजार होन मी देईन आणि मी जिंकलो तर तुमचा शिरच्छेद करेन.” पंडिताने हे ऐकले आणि तो घाबरला त्याला बुद्धिबळ खेळता येत नव्हते. पंडित म्हणाला,”महाराज, मला आपल्याइतकं चांगलं बुद्धिबळ खेळता येणार नाही, तेंव्हा मी मरणार हे निश्चित आहे. तेंव्हा माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. तेंव्हा मरण्यापूर्वी माझ्या कुटुंबाची सोय व्हावी म्हणून मला तांदूळ द्या अशी विनंती करतो.” राजा म्हणाला,”किती पाहिजे तितके मागा देतो!” पंडित म्हणाला,” महाराज! पण तांदूळ देताना मला असे द्या कि या बुद्धिबळाच्या पटाने मोजून द्या. म्हणजे पहिल्या घरात जर एक दाणा असेल तर दुसऱ्या घरात दोन थोडक्यात दुपटीने तांदळाची संख्या वाढवून मला द्या.” राजाला हे सोपे वाटले त्याने ते मान्य केले. राजाला गणित लक्षात आलं नाही. बुद्धिबळाच्या बत्तिसाव्या घरात जेंव्हा तांदूळ मोजणी चालू झाली तेंव्हा तांदळाची संख्या झाली होती २१४ कोटी. हे देण्यासाठी राजाचा पूर्ण खजिना रिता करावा लागणार होता. हे पाहून राजाने पंडितापुढे हात टेकले व त्याची योग्य सन्मानाने बोळवण केली.*
*तात्पर्य :- बुद्धीचातुर्यामुळे अवघड समस्येवर मात करता येते.*
* देशमुख. एस. बी*
*सचिव*
*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*
*कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.*
सौ. सविता एस देशमुख*
*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*
*7972808064*