❂ दिनांक:~ 07 ऑक्टोंबर 2022 ❂*
* वार ~ शुक्रवार *
* आजचे पंचाग *
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*आश्विन. 07 ऑक्टोबर*
*तिथी : शु. द्वादशी (शुक्र)*
*नक्षत्र : शतभिषा,*
*योग :- गंड*
*करण : कौलव*
*सूर्योदय : 06:25, सूर्यास्त : 06:33,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* सुविचार *
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*अपेक्षांनी सुरू होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*म्हणी व अर्थ *
*घर साकड नि बाईल भाकड.*
*अर्थ:- कोणत्याही बाबतीत अनुकूल परिस्थिती नसणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* दिनविशेष *
*या वर्षातील 279 वा दिवस आहे.*
* महत्त्वाच्या घटना *
*१९०५: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता.
*१९१९: महात्मा गांधींनी ’नवजीवन’ हे वृत्तपत्र सुरू केले.
*१९१९: के. एल. एम. (KLM) या विमानकंपनीची स्थापना झाली.
*१९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन ’एअर फ्रान्स’ ही कंपनी स्थापण्यात आली.
*१९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना
*१९५०: मदर टेरेसा यांनी कलकत्ता शहरात मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली होती.
*१९५८: पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इस्कंदर मिर्झा यांनी पाकिस्तानचे संविधान निलंबित केलं होत आणि मार्शल लॉ लागू करण्यात आला होता.
*१९९६: फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू होते.
*२००१: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.
*२००२: सलमान खान यांची वांद्रे पोलिसांत अटक.*
*जन्मदिवस / जयंती*
*१८६६: कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या ’तुतारी’, ’नवा शिपाई’, ’गोफण केली छान’ इ. कविता प्रसिद्ध आहेत. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)
*१८८५: नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९६२)
*१९००: हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (मृत्यू: २९ एप्रिल १९४५)
*१९०७: प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७)
*१९१४: बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (मृत्यू: ३० आक्टोबर १९७४)
*१९१७: विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक (मृत्यू: १३ मे २०१० – पुणे)
*१९२९: आयमॅक्स कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक ग्रॅमी फर्ग्युसन यांचा जन्म.
*१९५२: व्लादिमीर पुतिन – रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष
*१९५९: एक्स फैक्टर आणि ब्रिटन गॉट टेलेन्ट चे निर्माते शमौन कोवेल यांचा जन्म.*
*१९६०: आश्विनी भिडे-देशपांडे – शास्त्रीय गायिका*
*१९७८: जहीर खान – जलदगती गोलंदाज
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१७०८: गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (जन्म: २२ डिसेंबर १६६६)*
*१८४९: एडगर अॅलन पो – अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी (जन्म: १९ जानेवारी १८०९)
*१९५१: फिलिप्स कंपनी चे सहसंस्थापक एंटोन फिलिप्स यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १८७४)
*१९६१: साली प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक व्यक्ती केदारेश्वर गुप्ता यांचे निधन.
*१९७५: देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत (जन्म: १८ जानेवारी १८८९ – मुळबागल, कोलार, कर्नाटक)*
*१९९८: भाऊसाहेब वर्तक – महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री (जन्म: ? ? ????)
*१९९९: उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार (जन्म: १५ ऑगस्ट १९२९ – अहमदनगर)*
*२०११: अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९२५)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सामान्य ज्ञान *
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* बोधकथा *
*दैवी संपत्ती*
एक म्हातारं जोडप होतं. घरा जवळच्या जागेत भाज्या लावाव्यात म्हणून तन-मन लावून झटत होते. एकदा खणता खणता त्या म्हाता-या माणसाच्या कुदळीला काही तरी लागलं. त्यानं खणून पाहिलं तर ती एक पेटी होती. उघडताच त्यातल्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या. ती म्हातारी स्री म्हणाली,चला,आपण आता श्रीमंत झालो. आपल्या संकटकाळी देवाने आपल्यासाठी मदत पाठवली आहे. हे बघ,उगीचचं लाळ घोटू नकोस. ही जागा आपल्या मालकीची नाही. तेव्हा कशावरून देवाने ही संपत्ती आपल्यासाठीच पाठवली आहे,असे समजायचे ? म्हातारा म्हणाला. आपण ही अशीच इथे ठेवू देऊया. जर समज, ही संपत्ती आपल्यासाठीच देवाने पाठवली असेल,तर ती पाठवण्याची व्यवस्थाही तोच करेल.
पेटी होती त्याच जागी पुन्हा ठेवून ते दोघे तिथून निघून गेले. म्हातारीने ही गोष्ट सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. पण कुणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्या सगळ्यांना वाटलं की,म्हातारी काहीतरी थापा मारतेय. त्या गावात एक व्यापारी राहत होता.त्याला संपत्तीची खूप हाव होती त्याचाही तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता.पण एकदा खात्री करून घ्यावी या उद्देशाने तो एका रात्री त्या ठिकाणी पोहोचला. त्याने आपल्याबरोबर आपल्या दोन मुलांनाही घेतले.त्या तिघांनी ती पेटी खणून वर काढली. पेटीचे झाकण उघडताच नागाचा फुत्कार त्यांना ऐकू आला. तशी त्यांनी पेटी घाईघाईने बंद केली.आता मात्र व्यापा-याची खात्री पटली की, म्हातारीने आपल्याला फसवण्या साठीच हा डाव टाकला आहे. तेव्हा तिला चांगली अद्दल घडवावी या उद्देशाने त्या तिघांनी ती पेटी दोरखंडाने बांधून ओढत ओढत म्हातारीच्या घराबाहेर आणली व ते निघून गेले.
सकाळी दरवाजा उघडताच ती पेटी दारात पाहून त्या दोघांनाही आनंद झाला. ती पेटी उघडताच पुन्हा त्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या. त्या पेटीतून तो नाग केव्हाच पसार झाला होता. आता मात्र दोघांची खात्री पटली की, देवाने आपल्यासाठी पाठवलेली ही दैवी संपत्तीच आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* आजच्या बातम्या *
*कोरोना काळात भारताने केलेल्या कामाचं जागतिक बँकेकडून कौतुक, गरीब राष्ट्रांना मदतीचा हात दिल्याचा उल्लेख*
*शिवसेनेच्या चिन्हासाठीची लढाई अंतिम टप्प्यात, निवडणूक आयोग उद्यापर्यंत निर्णय देण्याची शक्यता*
*मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून दिली होती धमकी*
*मुंबई आणि नागपूरमध्ये एअरटेलची 5G सेवा सुरु, येत्या दोन-तीन दिवसात एअरटेल 5G चे प्लॅन जाहीर होणार*
*फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर, साहित्यातून सामाजिक बंधने उलगडून दाखविल्याबद्दल गौरव*
*मेक्सिकोच्या सिटी हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, महापौरांसह 18 जण ठार*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*श्री. देशमुख. एस. बी*
*सचिव*
*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*
*कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.
सौ. सविता एस देशमुख*
*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*
*7972808064*