परीपाठ/पंचाग/दिनविशेष

0

दिनांक:~ 22 सप्टेंबर 2022* 

        *वार ~ गुरूवार* 

           *आजचे पंचाग

*भाद्रपद. 22 सप्टेंबर*

     *तिथी : कृ. द्वादशी (गुरू)*   

        *नक्षत्र : आश्लेषा,*

          *योग :- शिव*

     *करण : कौलव*

*सूर्योदय : 06:20, सूर्यास्त : 06:40,*

            *सुविचार

*दुसऱ्याचं निरीक्षण करत राहिल्यास, निंदा करण्याची वृत्ती नकळतच वाढत जाते, पण आत्मनिरीक्षण केलं की, आपल्यातील अवगुण सहज लक्षात येतात.*

          *म्हणी व अर्थ

 *ऊस गोड लागला म्हणून* *मुळासकट खाऊ नये.* 

*अर्थ:- एखादी गोष्ट चांगली असली म्हणून ती फार उपभोगू नये.*

           *दिनविशेष*     

*या वर्षातील 265 वा दिवस आहे.*

     *महत्त्वाच्या घटना

*१६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.*                *१८८८: ’द नॅशनल जिऑग्रॉफिक’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.* 

*१९३१: नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.*

*१९६५: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.*

*१९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित ’पुरुष’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.*

*१९९५: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले. यातील बहुसंख्य तामिळ विद्यार्थी होते.*

*१९९५: घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकास असल्याचा दिल्ली उच्‍च न्यायालयाचा निर्णय.*

*१९९८: क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना ’महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्‍च सन्मान जाहीर.*

*२००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.*

    *जन्मदिवस / जयंती*

*१७९१: मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)*

*१८६९: व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)*

*१८८७: कर्मवीर भाऊराव पाटील – शिक्षणतज्ञ, बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण (मृत्यू: ९ मे १९५९)*

*१९०९: दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक (मृत्यू: ३ आक्टोबर १९५९)*

*१९१५: अनंत माने – पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ९ मे १९९५)*

*१९२२: नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.*

*१९२३: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.*

      *मृत्यू / पुण्यतिथी*

*१५३९: गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (जन्म: १५ एप्रिल १४६९)*

*१९५६: फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज (जन्म: २ सप्टेंबर १८७७)*

*१९५६: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज फ्रेडरिक सॉडी यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर …..)*

*१९७०: शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (जन्म: ३० मार्च १८९९)*

*१९९१: दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. (जन्म: १४ जानेवारी १९०५)*

*१९९४: जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार. एच. एम. व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. (जन्म: ६ एप्रिल १९०९)*

*२०११: मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे व शेवटचे नबाब (जन्म: ५ जानेवारी १९४१)*

       *सामान्य ज्ञान

   *जगातील वाळवंट कशास म्हणतात ?*

*सहारा*

*इजिप्तमधील प्रसिध्द नदी कोणती ?*

*नाईल*

*जागतिक महिला दिवस केव्हा साजरा करतात ?*

*८ मार्च*

*भारतात सर्वांत जास्त लोकसंख्या असणारे शहर कोणते ?*

*मुंबई*

*भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिने मोठे राज्य कोणते आहे ?*  

*राजस्थान*

           *बोधकथा

*कर्म आणि धर्म*

*भगवान गौतम बुद्ध यांना एका गावी प्रवचनासाठी निमंत्रण दिले होते. ज्या शेतकऱ्याने निमंत्रण दिले होते तो अत्यंत भाविक होता. आपणाबरोबर आपल्या गावातील लोकांना याचा लाभ व्हावा हि त्याची इच्छा होती. गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणात एक वृक्ष होता. त्याला पार होता. तेथे प्रवचन घेण्याचे ठरले. ज्या दिवशी प्रवचन सुरु होणार त्यादिवशीच त्या शेतकऱ्याला चिंतेने ग्रासले, त्याचा सर्वात लाडका बैल हरवला. शेतात बांधून ठेवला असता दावं तोडून बैल निघून गेला. शेतकरी बैलाला शोधायला बाहेर पडला. कोस-दोन कोस चालला. गावापलीकडच्या डोंगराशी कुरण होते. तिथे त्याने बैलाला शोधलं मात्र डोक्यात विचार प्रवचनाचे चालू होते. खूप वेळ निघून गेला होता. शेतकऱ्याला प्रवचनाला जाता आले नाही. तोपर्यंत प्रवचन संपले होते. गावकरी घरी निघून गेले होते. बैल मिळाल्याचा आनंद आणि प्रवचन हुकल्याच दुख असे दोन्ही भाव त्याच्या मनात होते.*

           *दुसऱ्या दिवशी मात्र शेतकरी वेळेत प्रवचनाला हजर राहिला. प्रवचन संपल्यावर विनम्रपणे गौतम बुद्धांच्या पाया पडून तो म्हणाला,” महाराज, मी काल प्रवचनाला येवू शकलो नाही. क्षमा करा. माझा बैल हरवला होता. पण बैलाला शोधतानासुद्धा माझे प्रवचन हुकले व चांगले विचार ऐकण्यापासून वंचित राहिलो याचे दुख मनाला डाचत होते.” यावर बुद्ध मंदस्मित करीत म्हणाले,” चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचे दु:ख तुला झाले यातच तुझे भले आहे. आणि बैलाला शोधणे हे तुझे कर्तव्य आहे. तू बैलाला शोधात असताना सुद्धा प्रवचनाचा विचार करत होता म्हणजेच तू कर्म करत असताना धर्माचा विचार करत होता, कर्म करणे हेच धर्माचे मुख्य सार आहे.”*

*तात्पर्य- कर्माचे पालन म्हणजे धर्माचे पालन होय.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂🌐▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 

*श्री. देशमुख. एस. बी*

*सचिव*

*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*

 *कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.*

सौ. सविता एस देशमुख

*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*

*7972808064*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here