परीपाठ/पंचाग/दिनविशेष

0

दिनांक:~ 24 सप्टेंबर 2022 ❂*

       *🎴 वार ~ शनिवार 🎴*

          *🏮 आजचे पंचाग 🏮*

    ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*भाद्रपद. 24 सप्टेंबर*

     *तिथी : कृ. चतुर्दशी (शनि)*   

        *नक्षत्र : पु. फाल्गुनी,*

          *योग :- साध्य*

     *करण : विष्टी*

*सूर्योदय : 06:22, सूर्यास्त : 06:39,*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           *🖋 सुविचार 🖋*

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*लोकांचे निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचे केलेले आत्मपरीक्षण कधीही उत्तम…!*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

  • *जळतं घर भाड्याने कोण घेणार?*

*अर्थ:- नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार?*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

             * दिनविशेष *    

*🌞या वर्षातील🌞 267 वा दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.*

*१९४८: होन्डा मोटर कंपनीची (Honda Motor Company) स्थापना.*

*१९६०: अणूशक्तीवर चालणार्‍या ’यू. एस. एस. एंटरप्राइझ’ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण*

*१९९०: साली शनि ग्रहावर पांढऱ्या रंगाचा डाग पाहण्यास मिळाला.*

*१९९४: ’सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीमुळे गाजलेले वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले.*

*१९९५: गेली अनेक वर्षे वाचकप्रिय ठरलेल्या ’मृत्यूंजय’ या कादंबरीसाठी लेखक शिवाजी सावंत यांना ’भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे ’मूर्तिदेवी पुरस्कार’ जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.*

*१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पातील २२० मेगावॉट क्षमतेचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.*

*२००७: भारताने महेन्द्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली ‘टी २० विश्वकरंडक’ जिंकला.*

*२००९: साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जाहीर केलं की, स्वदेशी निर्मित चंद्रयान १ ने चंद्रावर पाणी असल्याचे नमूद केलं.*

*२०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.*

*२०१५: मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत ७१७ लोक ठार.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*१५३४: गुरू राम दास – शिखांचे ४ थे गुरू (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)*

*१८५६: साली प्रख्यात भारतीय हिंदी निबंध लेखक व नाटककार प्रताप नारायण मिश्र यांचा जन्मदिन.*

*१८६१: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)*

*१९२४: गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष (मृत्यू: ३१ मार्च २००४)*

*१९२५: भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २००४)*

*१९४०: आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू (मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४)*

*१९५०: मोहिंदर अमरनाथ – क्रिकेटपटू आणि समालोचक*

      *मृत्यू / पुण्यतिथी*

*१९७५: साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बहुभाषिक लेखक, व चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अलूरी चक्रपाणी यांचे निधन.*

*१९९२: सर्व मित्र सिकरी – भारताचे १३ वे सरन्यायाधीश (जन्म: २६ एप्रिल १९०८)*

*१९९८: वासूदेव पाळंदे – बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक व कुशल संघटक. पुण्यातील ’प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’, ’महाराष्ट्रीय कलोपासक’, ’जागर’ इ. नाट्यसंस्थांच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. (जन्म: ? ? ????)*

*२००२: साली प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ तसचं, भारतातील रिमोट सेन्सिंगचे जनक पी. आर. पिशरोटी यांचे निधन.*

*२००२: श्रीपाद रघुनाथ जोशी – लेखक, शब्दकोशकार व अनुवादक (जन्म: ? ? ????)*

*२०१२: साली केरळ राज्य पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध ज्येष्ठ भारतीय मल्याळम भाषिक चित्रपट व रंगमंच अभिनेते के. सुरेंद्रनाथ थिलकन यांचे निधन.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

          *सामान्य ज्ञान *

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात ?*

*५ जून*

*कोणत्या रक्तगटाला सर्वग्राही रक्तगट म्हणतात ?*

*AB*

*उष्णतेचे एकक काय आहे ?*

*कॅलरी*

*जैन धर्माचे संस्थापक कोण आहेत ?*

*वर्धमान महावीर*

*जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ?*

*जिराफ*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           * बोधकथा *

*मूल्यांकन*  

 *एका महात्म्याच्या शिष्यांमध्ये एक राजकुमार आणि एक शेतकऱ्याचा मुलगा होता. राजकुमाराला राजपुत्र असण्याचा अहंकार होता.मात्र शेतकऱ्याचा मुलगा विनम्र आणि कर्मठ होता.राजकुमाराचे वडील अर्थात तेथील राजा दरवर्षी एका स्पर्धेचे आयोजन करीत असत. त्यात बुद्धिमत्ता आणि दृष्टीची पारख केली जात असे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरदूरचे राजकुमार येत असत. अध्ययन पूर्ण झाल्यावर राजकुमाराने शेतकऱ्याच्या मुलालाही या स्पर्धेत सामील होण्याचे आमंत्रण दिले. कारण त्याला तेथे बोलावून त्याचा अपमान करण्याचे त्याच्या मनात होते. जेंव्हा शेतकऱ्याचा मुलगा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा त्याला राजकुमार आणि राजपुत्रांमध्ये बसण्यास मनाई केली.*

              *शेवटी शेतकऱ्याचा मुलगा वेगळा बसला. राजाने प्रश्न विचारला,”तुमच्यासमोर जर जखमी वाघ आला तर तुम्ही त्याच्यावर उपचार कराल का त्याला तसेच सोडून निघून जाल ?” सर्व राजपुत्रांचे उत्तर हे एकच होते. “आम्ही आमचा जीव धोक्यात घालून वाघावर उपचार करणार नाही.” मात्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला,” मी जखमी वाघावर उपचार करेन कारण जखमीचा जीव वाचविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. माणूस होण्याच्या नात्याने माझे हे कर्म आहे. मांस खाणे हे जर वाघाचे कर्म असेल तर तो बरा झाल्यावर माझा जीव का घेईना ? त्यात त्याचा दोष नाही. माणूस म्हणून मी त्याच्यावर उपचार करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे.” हे उत्तर ऐकताच राजाने त्या मुलाला विजयी घोषित करून राज्याचे मंत्रिपद दिले.*

*तात्पर्य:- व्यक्तीचे मुल्यांकन हे त्याच्या विचारातून होत असते. त्याच्या राहणीमानावरून कि त्याच्या दिसण्यावरून होत नसते. कधी कधी साधारण दिसणारी माणसे असाधारण कार्य करतात.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 ▂▂▂▂▂▂▂▂▂ 

*श्री. देशमुख. एस. बी*

*सचिव*

*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*

*कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.*

सौ. सविता एस देशमुख

*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*

*📱7972808064📱*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here