परीपाठ/पंचाग/दिनविशेष

0

*❂ दिनांक:~ 29 सप्टेंबर 2022 ❂*

       *🎴 वार ~ गुरूवार 🎴*

          * आजचे पंचाग *

    ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*आश्विन. 29 सप्टेंबर*

     *तिथी : शु. चतुर्थी (गुरू)*   

        *नक्षत्र : विशाखा,*

          *योग :- विष्कंभ*

     *करण : वनिज*

*सूर्योदय : 06:23, सूर्यास्त : 06:35,*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           *🖋 सुविचार 🖋*

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*जनावराचे जिणे जगणे.*

*अर्थ:- अन्याय, त्रास सहन करत राहणे.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

             * दिनविशेष *    

*🌞या वर्षातील🌞 272 वा दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*१८२९: लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.*

*१८३६: साली मद्रास चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीची स्थापना करण्यात आली.*

*१९१७: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची (IES) पहिली शाळा ’किंग जॉर्ज हायस्कुल’ सुरू झाली.*

*१९६३: ’बिर्ला तारांगण’ हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले.*

*१९४१: दुसरे महायुद्ध – किएव्हमधे नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.*

*२००१: साली सयुक्त राष्ट्राने अमेरिकेचा आतंकवाद विरोधी प्रस्ताव पारित केला.*

*२००८: ’लेहमन ब्रदर्स’ आणि ’वॉशिंग्टन म्युच्युअल’ या बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा ’डाऊ जोन्स’ निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. ही अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे.*

*२०१२: अल्टमास कबीर यांनी भारताचे ३९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*

*२०१४: साली समलिंगी जोडप्यांचा पहिला विवाह इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडला.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*१९२५: डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक (मृत्यू: १५ जानेवारी २०१३)*

*१९२८: ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१२)*

*१९३२: हमीद दलवाई – मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू (मृत्यू: ३ मे १९७७)*

*१९३२: महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता (मृत्यू: २३ जुलै २००४)*

*१९३८: चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९५४)*

*१९४३: लेक वॉलेसा – नोबेल पारितोषिक विजेते पोलंडचे राष्ट्राध्यक्ष*

*१९४७: साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्मदिन.*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*१९१३: रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक (जन्म: १८ मार्च १८५८)*

*१९४२: साली भारताच्या स्वातंत्र्या करिता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर भारतीय क्रांतिकारक महिला मातंगिनी हाजरा यांचे निधन.*

*१९८७: अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड दुसरा यांचे निधन.*

*१९९१: उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)*

*२००४: साली पद्मभूषण पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय मल्याळम भाषिक कवयित्री बालमणी अम्मा यांचे निधन.*

*२०१७: साली अमेरिकन वंशीय भारतीय चित्रपट अभिनेते व दूरदर्शन कलाकार टॉम आल्टर(Tom Alter) यांचे निधन.*

 

          *🥇सामान्य ज्ञान 🥇*

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे ?*

*किसन बाबुराव हजारे*

*जिल्हा परिषदेत स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात ?*

*५० %*

*कोणत्या देशात पाच सूर्य दिसतात ?*

*चीन*

*मीनाबकम इंटरनॅशनल एअरपोर्ट कोणत्या ठिकाणी आहे ?*

*चेन्नई*

*महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?*

*अहमदनगर*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           *बोधकथा *

*निवड*

   दुर्गम भागात फिरताना तीन साधुना एक झोपडी दिसते, ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. घरातील महिला त्यांच्याकडे विचारणा करते,”आपण कोण आहात? आणि आपल्याला काय हवे आहे?” ते म्हणतात,”आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही व्यवस्था करा.” झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करत महिला पुन्हा घरात गेली, काही काळानंतर बाहेर येत ती तिन्ही साधूना जेवणासाठी आमंत्रित करते. तेंव्हा साधू म्हणतात,” आमच्यापैकी केवळ एकचजण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू शकतो.” महिला आश्चर्यचकित होते व विचारते,” असे का? भूक तिघानाही लागली आहे. पण येणार मात्र एकचजण?” साधू म्हणतात,” हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक “वैभव” आहे. तर दुसरा “यश” आणि तिसरा “प्रेम”. आता तू ठरव कि आमच्यातील कोणाला आत बोलवायचे?” महिला गोंधळून जाते.

                ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व “प्रेम” नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ “वैभव” आणि “यश” साधू पण जेवणासाठी घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते, तेंव्हा साधू म्हणतात,” मुली ! तू प्रेम मागितले, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेशकर्ते झाले, पण तू वैभव किंवाप्रेम यांना जर पाचारण केले असते तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते.” महिलेने तिघांचे यथायोग्य स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले.

*तात्पर्य :-जगात प्रेमापाठोपाठ यश आणि वैभव हि आयुष्यात,घरात येते.*

 

*श्री. देशमुख. एस. बी*

*सचिव*

*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*

कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.

*सौ. सविता एस देशमुख

*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*

*📱7972808064📱*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here