*परीपाठ*
*❂ दिनांक:~ 30 सप्टेंबर 2022 ❂*
*वार ~ शुक्रवार *
* आजचे पंचाग *
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*आश्विन. 30 सप्टेंबर*
*तिथी : शु. पंचमी (शुक्र)*
*नक्षत्र : अनुराधा,*
*योग :- प्रीती*
*करण : बव*
*सूर्योदय : 06:23, सूर्यास्त : 06:34,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* सुविचार *
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवा शिवाय दुसरा कोणीच नसावा.*…….
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*म्हणी व अर्थ *
*अचाट खाणे अन् मसणात जाणे.*
*अर्थ :- वाजवीपेक्षा जास्त जेवण करीत राहिले तर मरण जवळ येते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* दिनविशेष *
*आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन*
*या वर्षातील 273 वा दिवस आहे.*
* महत्त्वाच्या घटना *
*१९३५: हूव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.*
*१९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.*
*१९६१: दुलीप करंडकाचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.*
*१९९३: लातूर येथे झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार तर हजारो लोक बेघर झाले.*
*१९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’दादासाहेबफाळके पुरस्कार’ प्रदान*
*१९९८: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) सेंद्रीय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना ‘शांतिस्वरुप भटनागर’ पुरस्कार जाहीर*
*२०१९: साली बिहार राज्यात झालेल्या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.*
*२०१९: साली एअर चीफ मार्शल आर. के. एस भदोरिया यांनी वायुसेना दलाचे प्रमुख पद सांभाळले.*
*२०००: देशातील रासायनिक उद्योगाची वाढ आणि प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाऊंडेशनतर्फे ’हॉल ऑफ फेम’ हा विशेष पुरस्कार जाहीर*
*जन्मदिवस / जयंती*
*१८३२: मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका ऍन जार्विस यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९०५)*
*१८३७: साली भारतीय हिंदी आणि पंजाबी भाषिक साहित्याचे लेखक व समाजसुधारक तसचं, “आधुनिक पंजाबी गद्याचे जनक” पंडित श्रद्धाराम शर्मा यांचा जन्मदिन.*
*१९२२: हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)*
*१९३३: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (मृत्यू: २८ डिसेंबर २००६)*
*१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान डायझेनहॉफर यांचा जन्म.*
*१९५५: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक अँनी बेचोलॉल्म्स यांचा जन्म.*
*१९७२: शंतनु मुकर्जी ऊर्फ ’शान’ – पार्श्वगायक*
*१९८०: मार्टिना हिंगीस – स्विस लॉनटेनिस खेळाडू*
*१९००: एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१९१४: साली प्रख्यात भारतीय उर्दू कवी आणि लेखक अल्ताफ हुसैन हाली यांचे निधन.*
*१९४३: साली कलकत्ता शहरावर आधारित मासिक मॉडर्न रिव्ह्यूचे संस्थापक, संपादक आणि मालक तसचं, हिंदू महासभेचे नेता आणि भारतीय पत्रकारितेचे जनक रामानंद चटर्जी यांचे निधन.*
*१९८५: चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक (जन्म: २६ एप्रिल १९००)*
*१९९२: गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)*
*१९९८: चंद्राताई किर्लोस्कर – ’भूदान’ चळवळीतील कार्यकर्त्या*
*२००१: केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव शिवाजीराव शिंदे यांचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन (जन्म: १० मार्च १९४५ – मुंबई)*
*२०१४: भारतीय पाद्री आणि राजकारणी मोलिवि इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९४३)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सामान्य ज्ञान *
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?*
*१ मे १९६०*
*राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ?*
*श्यामची आई*
*छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुली होत्या ?*
*६*
*पंडिता रमाबाई यांचे पूर्ण नाव काय आहे ?*
*रमाबाई बिपिनबिहारी दास*
*महाराष्ट्रात एकूण किती ग्रामपंचायती आहेत ?*
*२७,९९३*▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* बोधकथा * *सत्कृत्य*
*एका वनात एक पारधी राहत होता. त्याने खूप वन्य प्राण्यांची हत्या केली होती. त्यामुळे तो खूप पापी झाला होता. त्याची चाहूल लागली तरी वन्यप्राणी भीतीने प्राणी थरथर कापत असत. एकेदिवशी तो आपल्या शिकारीच्या शोधात असताना एका बेलपत्राच्या झाडावर चढला. खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्याच्या हाती लागली नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्याचा उद्योग चालू होता. झाडाच्या बुंध्याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला पण हे पारध्याला माहित नव्हते. त्या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्या पिंडीवर बेलाच्या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्न झाले व ते पारध्याच्या समोर प्रकट झाले. त्यांना समोर पाहून पारधी आश्चर्यचकित झाला व म्हणाला,”महादेवा, मी खूप क्रूर आहे, अनेक वन्यप्राणी मारले आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले पण पुण्याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्न झालात?” यावर महादेव म्हणाले,”तू हिंसक आहेस, तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस. पूजा-प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्याचे चांगलेच फळ मिळते. जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्कार्य केलेस तर किती फळ मिळेल? पारध्याला आपली चूक समजली व त्याने आयुष्यभर कष्ट करून जीवन जगला.*
तात्पर्य :-
*एका सत्कृत्यामुळे देखिल आपले आयुष्य बदलून जाऊ शकते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* देशमुख. एस. बी*
*सचिव*
*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*
कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F
सौ. सविता एस देशमुख*
*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*
*7972808064*