परीपाठ / पंचाग/ दिनविशेष

0

*❂ दिनांक:~ 18 सप्टेंबर 2022 ❂*

       * वार ~ रविवार *

          * आजचे पंचाग *

   

*भाद्रपद. 18 सप्टेंबर*

     *तिथी : कृ. अष्टमी (रवि)*   

        *नक्षत्र :  मृग,*

          *योग :- सिद्धी*

     *करण : तैतिल*

*सूर्योदय : 06:18, सूर्यास्त : 06:45,*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           * सुविचार *

     *आयुषाच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           *म्हणी व अर्थ *

*अंगावरचे लेणे,जन्मभर देणे.*

*अर्थ:- दागिण्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्म भर फेडत बसायचे.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

             * दिनविशेष *    

*या वर्षातील 261 वा दिवस आहे.*

    * महत्त्वाच्या घटना *

*२००९ : टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे आणि त्याआधी रेडिओवर सलग १५ वर्षे सुरू असलेल्या ’द गायडिंग लाईट’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.*

*२००२ : चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्‍च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.*

*१९९९ : साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर*

*१९९७ : महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.*

*१९४८ : निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ’ऑपरेशन पोलो’ स्थगित करण्यात आले.*

*१९४७ : अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.*

*१९२७ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना*

*१९२४ : गांधीजींनी हिदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.*

*१८८५ : कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.*

    *जन्मदिवस / जयंती*

*१९१२ : गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५)*

*१९०६ : प्रभूलाल गर्ग ऊर्फ ‘काका हाथरसी’ – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. ’मेरा जीवन ए वन’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. १९३२ मध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेले ’संगीत’ हे मासिक सुरू केले, ते आजतागायत चालू आहे. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ – हाथरस, उत्तर प्रदेश)*

*१९०५ : ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (मृत्यू: १५ एप्रिल १९९०)*

*१९०० : शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५)*

*१७०९ : सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)*

      *मृत्यू / पुण्यतिथी*

*२००४ : डॉ. भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक (जन्म: १३ मे १९२५)*

*२००२ : शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची ’मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा ’मूर्तीदेवी पुरस्कार’ मिळाला आहे. (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)*

*१९९९ : अरुण वासुदेव कर्नाटकी – मराठी चित्रपट दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)

*१९९५ : प्रभूलाल गर्ग ऊर्फ ‘काका हाथरसी’ – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. ’मेरा जीवन ए वन’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. १९३२ मध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेले ’संगीत’ हे मासिक सुरू केले, ते आजतागायत चालू आहे. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)

*१९९३ : असित सेन – विनोदी अभिनेते व दिग्दर्शक, त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांतून भूमिका केल्या (जन्म:*

*१९९२ : मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ – २० ऑगस्ट १९८४) आणि ११ वे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ – १६ डिसेंबर १९७०) (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)*

*१७८३ : लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (जन्म: १५ एप्रिल १७०७)*

 

          *सामान्य ज्ञान *

     

*जगात सर्वप्रथम प्लास्टिक कप्स आणि प्लेटस्‌वर बंदी घालणारा देश कोणता ?*

*फ्रान्स*

*ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग होतो ?*

*त्वचा*

*सदाफुलीपासून कर्करोगावरील कोणते औषध मिळविले जाते ?*

*व्हिनक्रिस्टीन*

*मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?*

*सायकॉलॉजी*

*आंबोली हे पर्यटनस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?*

*सिंधुदुर्ग*

           *बोधकथा *

*पाण्याचा पैसा पाण्यात*

     *एका खेडेगावात एक दूधवाला रहत असे. त्याने आयुष्यभर लबाडीने वागून बराच पैसा मिळविला होता. त्याच्या जवळ बऱ्याच म्हशी होत्या. त्या म्हशीचे दुध काढून ते तो शहरात जाऊन विकत असे. शहरात त्याच्या दुधाला चांगला भाव मिळत असे. परंतु शहरातील गिऱ्हाइकपर्यंत पोहचण्यासाठी त्याला रोज नदी पार करून जावे लागे. नदी पार करण्यासाठी तो बोटीचा उपयोग करत असे. बोटीतून नदी पार करताना तो बरोबर असलेल्या दुधात सहजपणे नदीचे पाणी मिसळत असे. आणि ते दुध तो चांगला नफा मिळवून विकत असे. एक दिवस त्याच्या मुलाचे लग्न ठरले. मुलाचे लग्न थाटामाटात करण्यासाठी शहरात जाऊन त्याने आपल्या गिऱ्हा इकाकडून  पैश्याची वसुली केली. बरेच पैसे गोळा झाल्यावर त्या पैश्यातून त्याने भरजरी कपडे खरेदी केले . तसेच सोन्याचे दागिने सुद्धा विकत घेतले. हे सर्व बरोबर घेऊन तो बोटीने घराकडे निघाला. नदी पार करताना मात्र बोट पाण्यात उलटली. सर्व किमती वस्तू पाण्यात पडून वाहून गेल्या. दुधवाला मूकपणे शोक करू लागला. तेवढ्यात नदीतून आवाज आला. ” रडू नकोस गिऱ्हा इकांना फसवून तू जी बेकायदेशीर संपत्ती गोळा केली होतीस तिच वाहून गेली आहे.”*

*तात्पर्य : –*

 *चांगल्या मार्गाने मिळविलेली संपत्ती टिकते. तर वाईट मार्गाने आलेली कधीही टिकत नाही.*

 

       

*सौ. सविता एस देशमुख

*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*

*📱7972808064*

*श्री. देशमुख. एस. बी*

*सचिव*

*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*

*कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here