पश्चिम भागातील राज्यमार्ग ७ सह सर्वच रस्त्यांसाठी पाठपुरावा सुरु :-आ. आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचे शहाजापूर पर्यंत काम पूर्ण झाले असून शहाजापूर ते सात मोऱ्या (कोपरगाव तालुका हद्द) या रस्त्यासह सर्व रस्त्यांसाठी पाठपुरावा करीत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील वडगाव-बक्तरपूर येथील कार्यक्रमात सांगितले.

बक्तरपुर येथे जलजीवन मिशन अंतर्गत ५१.६१ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन,२० लक्ष रुपये निधीतून सोमठाणे रोड, बक्तरपुर चौफुली ते मुरलीधर सानप घर रस्ता व ओपन जिम साहित्याचे लोकार्पण तसेच वडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत ३६.५५ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व ९.६५ लाख रुपयांच्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, राज्यमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती.नागरिकांना व वाहनचालकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून देर्डे फाटा ते सात मोऱ्या (कोपरगाव तालुका हद्द) या रस्त्याला निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून राज्यमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचे शहाजापूर पर्यंत काम पूर्ण झाले आहे. तसेच ब्राम्हणनाल्यावरील पुलासाठी देखील निधी मिळवून या पुलाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. शहाजापूर ते सात मोऱ्या (कोपरगाव तालुका हद्द) या रस्त्यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला असला तरी या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट घेवून या रस्त्याला तातडीने निधी मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्यासाठी देखील निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. याप्रसंगी बक्तरपुर येथील काशिनाथ सानप, संजय सानप, विजय सानप, अशोक जाधव व संदीप आव्हाड यांनी आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. मच्छिंद्र बर्डे, सचिन चांदगुडे, सुनील मांजरे, श्रीराम राजेभोसले, माजी संचालक मिननाथ बारगळ, भास्करराव चांदगुडे, दिलीपराव चांदगुडे, प्रभाकर चांदगुडे, खंडेराव सोनवणे, सोमनाथ चांदगुडे, अशोकराव माळी, महेश आहेर, कचरू घुमरे, खंडेराव सोनवणे, अशोकराव माळी, उत्तमराव भुसे, संजय कांगणे, सोमनाथ बारगळ, लोकनियुक्त सरपंच सौ. मनिषा कांगणे, सोमनाथ कांगणे, मारुती कांगणे, भीमराज केदार, दौलत सोनवणे, सुनील डोंगरे, सुभाष डोंगरे,पोलीस पाटील भारत सानप, नाना सानप, अशोक नागरे, नंदू बोडके, राजाराम सानप, उपसरपंच धर्मा नागरे, कचरू घुमरे, काळू नागरे, सर्जेराव सानप, विलास सानप, सोमनाथ सानप, गणेश नागरे, माधव नागरे, सचिन गरुड, साहेबराव सानप, सुरेश नागरे, शरद गरुड, अरुण डोंगरे, भाऊसाहेब सानप, निलेश सानप, कैलास सानप, सुखदेव सानप, प्रकाश सानप, गणेश सानप, विशाल सानप, साहेबराव गरुड, वैभव सानप, प्रकाश गरुड, नानासाहेब सानप, प्रवीण गंभीरे, पुंजाबा नागरे, सुनील सानप, भाऊसाहेब शिंदे, विजय सानप, राजु सानप, संदीप आव्हाड, दगु गरुड, सुदाम गरुड, समाधान सानप, सुनील सानप, पंचायत समिती वाघ, सार्वजनिक बांधकाम असि. अभियंता गाडे, ग्रामसेवक एफ. एम. तडवी सुखदेव सानप, रामदास सोनवणे, भास्कर वाकळे, भागिनाथ कांगणे, पुंडलिक सानप, संदीप सांगळे, पांडुरंग केदार, सुरेश कांगणे, पंडितराव बारगळ, अंकुश सोनवणे, संजय कांगणे, रमेश डोंगरे, परसराम बारगळ, प्रकाश सानप, सुनील बारगळ, नवनाथ कांगणे, सुखदेव सानप, मिननाथ वाकळे, कैलास कांगणे, राहुल वाकळे, प्रदीप कांगणे, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रवीण कांगणे, विलास डोंगरे, किशोर डोंगरे, रामेश्वर केदार, भाऊसाहेब वाकळे, गणेश साळवे, संगीता सोनवणे, अनिल बारगळ, कांताताई बारगळ, अंजनाताई सोनवणे, लक्ष्मी मस्के, कचरू माळी, माधवराव केदार, वाल्मीक केदार, गोकुळ सांगळे, मधुकर बारगळ, ग्रामसेवक एस. बी. पटाईत आदींसह वडगाव व बक्तरपूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ – वडगाव-बक्तरपूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here