पाचरट जाळत असताना शेजारील लाखो रूपयांचा ऊस जळून खाक, पोलिसात गुन्हा दाखल.

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी

            शेतातील पाचरट जाळत असताना काळजी न घेतल्याने शेजारील एक एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना राहुरी शहर हद्दीत दिनांक ५ ऑक्टोबर रोजी घडलीय. या बाबत प्रवीण भागवत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

        अभिजीत सुरेश भागवत, वय ४२ वर्षे, राहणार पिंपळाचा मळा, डावखर वस्ती, राहुरी. यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सुमारे बारा वाजे दरम्यान आरोपी प्रवीण भागवत हा त्याच्या शेतातील पाचरट जाळत होता. त्यावेळी त्याने काळजी घेतली नाही. त्याच्या निष्काळजीपणामुळे त्याच्या शेजारी असलेल्या ऊसाला आग लागली. आणि अभिजीत भागवत यांचा एक एकर ऊस जळून खाक झाला. त्यामध्ये त्यांचे लाखो रूपयांचे नूकसान झाले. 

        अभिजीत सुरेश भागवत यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रवीण भास्कर भागवत याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ९५२/२०२२ भादंवि कलम ३३६, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शहामद शेख हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here