जामखेड तालुका प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील पिंपळवाडी येथील शिवाजी निवृत्ती नेमाने (वय ६५ वर्ष) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाट उचकटून त्यातून रोख रक्कमेसह व सोन्याच्या दागिने असा ६३ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा चोरटे पसार झाले या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर माहिती असे की, जामखेड तालुक्यातील पिंपळवाडी या येथील शेतकरी शिवाजी निवृत्ती नेमाने (वय ६५ वर्ष) यांच्या बंद घराचा दरवाजा अज्ञात चोरट्याने दि. १ अॉक्टोबर रोजी दुपारी १:०० ते ३:०० वाजण्याच्या सुमारास कशाचे तरी साह्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. व घरामध्ये असलेल्या कपाटातील ५३ हजार ७५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख १० हजार रुपये असा एकूण ६३ हजार ७५० रुपये किमतीचा ऐवज भरदिवसा चोरून चोरटे लंपास झाले
या प्रकरणी शिवाजी निवृत्ती नेमाने रा. पिंपळवाडी ता.जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे हे करत आहेत.