चित्तेपिंपळगाव : नव्याने झालेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिड बायपास रोडरील गांधेली शिवारात सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे याबाबत वाहतूक पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिड बायपास रोड जवळील गांधेली शिवारात सोलापूरकडे जाणारी महिंद्रा लोडींग पिकअपचे टायर पंक्चर झाले ,ते पंक्चर टायर चालक बदलत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या आयशरने या गाडीला जोराची धडक दिली.
यात गाडीत बसलेल्या गयाबाई नरहरी लाड( वय 65) वर्षे रा बजाज नगर,ता.औरंगाबाद,या जागेवर ठार झाल्या तर गीता विष्णू लाड (वय 35) वर्ष रा. बजाजनगर ,औरंगाबाद या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना वाहतूक पोलीसांच्या मदतीने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताचं वाहतूक पोलीस शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्री नागवे ,श्री जाधव कर्मचारी गोल्डे ,पोहे ,राघुडे , ठोंबरे,काकड यांनी घटनास्थळी धाव घेतली व रस्त्यावरील दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली