पिडीतेचा विनयभंग केला यावरून आरोपी सचिन बांगर वर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0

आरोपी सचिन बांगर फरार असुन पोलीस त्याचा शोध घेत आहे 

जामखेड तालुका प्रतिनिधी 

       जामखेड पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या  एका खाजगी उच्च माध्यमिक  विद्यालय असुन जामखेड तालुक्यातील एका गावातुन या घटनेतील फिर्यादी पिडीता पायी घरी जात असताना आरोपीने मोटारसायकलवर येऊन तिचा विनयभंग केल्याची घटना काल दि. २१ सप्टेंबर रोजी घडली आहे. 

    या बाबत सविस्तर माहिती असे की, या घटनेतील पिडीता एका खाजगी उच्च माध्यमिक विदयालय  येथुन पायी घरी जात असताना निसर्गराज हॉटेलचे पुढे वडाचे झाड जवळ असताना यातील आरोपी सचिन राजेंद्र बांगर याने मोटारसायकलवर येवुन फिर्यादीचा डावा हात धरुन शेताकडे ओढुन, फिर्यादीच्या तोंडात हाताने चापटाने मारुन, वगैरे फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने पिडीतेचा विनयभंग केला यावरून जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं. व कलम :- ४४३/२०२२ भांदवि कलम  ३५४, ३५४(ड), ३२३ ,बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२  प्रमाणे आरोपी सचिन बांगर राहणार जामखेड तालुक्यातील रेडेवाडी याचे विरूद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी हा फरार असुन जामखेड पोलीस त्याचा शोध घेत आहे आरोपी सचिन बांगर याच्या विरुद्ध कडक कारवाई करावी पिडीतेच्या कुंटुबीयाची मागणी

    पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here