पुणे अपघात प्रकरणी 2 पोलीस कर्मचारी निलंबित

0

पुणे : पुण्यात 18 मे 2024 रोजी पहाटे जे घडलं, त्याची संतप्त प्रतिक्रिया केवळ पुण्यात नाही, तर देशभर उमटली. एका नंबर प्लेट नसणाऱ्या, भरधाव वेगानं जाणाऱ्या, अलिशान पोर्शे कारनं पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास एका दुचाकीला उडवलं. त्या दुचाकीवर चाललेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

या प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यातील 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

तपासात दिरंगाई केल्याबद्दल आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा आरोप लावत या दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. स्त्यावरच्या लोकांनी कार चालवणाऱ्या पकडलं, मार दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं. त्या रात्रीचे व्हीडिओ एव्हाना व्हायरल झाले आहेत. काय आणि कसं घडलं हे सगळ्यांना समजलं. पण त्यानंतर जे जे घडलं, त्यानं मात्र सगळ्यांनाच धक्का बसला. अनेकांसाठी ते अनाकलनीय होतं.

या प्रकरणात भरधाव कार चालवणारा पुण्यातल्या एका बिल्डरचा अल्पवयीन मुलगा होता. पुढच्या अवघ्या काही तासांमध्ये त्याला न्यायालयाकडून काही अटीशर्तींवर जामीन मिळाला. समाजमाध्यमांवर चर्चा सुरु झाली. अगोदर आश्चर्य आणि मग बघता बघता हे प्रकरण संतापजनक होत गेलं.

दोघांच्या मृत्यूचं जे गंभीर प्रकरण होतं, त्यात व्यवस्था कोणाच्या बाजूनं आहे, असे सवाल थेट विचारले जाऊ लागले. समाजमाध्यमांपासून ते रस्त्यावर हा राग पहायला मिळाला. पोलिस स्टेशनबाहेर आंदोलनं झाली. केवळ पुण्यातूनच नाही, तर सगळीकडूनच या प्रतिक्रिया वाहू लागल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here