पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एका मनमानी कंटेनरने कारला आपल्या कवेत घेत सुमारे दोन किलोमीटरपर्यंत ओढून नेले.
या अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कंटेनरने ओढलेल्या कारमध्ये चार प्रवासी होते. मात्र हे सर्व प्रवासी बचावले.
महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. <p>कंटेनरसमोरील रस्त्यावर ठिणग्या उडत असल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरून कंटेनरचा वेग किती असेल याचा अंदाज बांधता येतो. पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी कारमध्ये चार प्रवासी होते. या भीषण अपघातातून चार प्रवासी थोडक्यात बचावले. कारमधील कोणीही जखमी झाले नाही.