उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील पुनाडे आदिवासी वाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कामोठे येथील पुष्पकलश सोसायटीतील रहिवासी संजय हडवले यांच्या कन्या श्रीशा हीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त गोडेतेल,साखर ,रवा ,डाळ तांदूळ या जीवनाश्यक वस्तूंचे व खाऊ वाटंप करण्यात आले.
दिवाळीच्या ऐन सनाच्या वेळी मिळालेल्या जीवनाश्यक वस्तू व खाऊ यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पहाण्यासारखा होता.या वेळी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे चे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण मनोज पाटील ,संजय हडवळे ,लता हडवळे,सुप्रिया हडवळे,मानसी पाटील ,शाळेचे मुख्याध्यापक दिलिप म्हात्रे ,शिक्षक संदिप भोपरे आदि मान्यवर उपस्थित होते.