पैठण तालुका मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी इंजि.विजय काकडे 

0

पैठण,दिं.७: मराठा सेवा संघाच्या पैठण तालुकाध्यक्षपदी इंजि.विजय पाटील काकडे यांची नियुक्ती करण्यात आली असून विजय काकडे हे जायकवाडी दगडी धरण येथे धरण अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

  मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री संदीपानजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाचे औरंगाबाद

जिल्हाध्यक्ष शिवश्री धनंजय पाटील यांच्या हस्ते इंजि. विजय प्रल्हादराव पाटील काकडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

नियुक्ती पत्रात म्हटले आहे की,मराठा सेवा संघ या वैचारिक चळवळीसाठी आपण वेळ श्रम बुध्दी, पैसा कौशल्य है पंच दान देऊन सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत आहात. आपण केलेल्या कार्याची दखल घेत आपल्याला हेच कार्य व्यापक रितीने करण्याची संधी मिळावी तसेच आपल्या माध्यमातुन संघटन अधिकाधिक बळकट व्हावे यासाठी मराठा सेवा संघाच्या पैठण तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते आपली नियुक्ती करण्यात आली आहे.

सदरील नियुक्तीपत्र दिलेल्या तारखेपासून एक वर्षाची असणार आहे.या नियुक्ती बद्दल शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद प्रदेश संघटक अरुण गोर्डे, मराठा सेवा संघाचे औरंगाबाद जिल्हा संघटक अशोक भागवत, जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब पठाडे, पैठण मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष शिवश्री दशरथ खराद यांनी विजय काकडे यांचे  अभिनंदन केले आहे.

———-

फोटो : जायकवाडी : मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र विजय काकडे यांना देताना अरूण गोर्डे, दादासाहेब पठाडे, अशोक भागवत, दशरथ खराद सह आदी.(छायाचित्र : गजानन आवारे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here