पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन,
पतसंस्थेचे एकुण 772 सभासद,नवीन 22सभासदांची पतसंस्थेत भर
पैठण,दिं.२९ : पैठण तालुका शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्थेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.28ऑगस्ट 2022 रोजी अभिनंदन मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सर्वप्रथम पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी पतसंस्थेच्या वतीने आलेल्या मान्यवरांसह सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
पतसंस्थेचे ताळेबंद वाचन पतसंस्थेचे चेअरमन आबासाहेब कणसे पाटील यांनी वाचुन दाखविले सभासद फिस ५%टक्के कपात केली जाते कर्ज वाटपात भर करुन सभासदांना सेवा दिले जाते.22नविन सभासद नोंदणी झाली आहे तर पतसंस्थेचे एकुण 772 सभासद आहेत.पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 22कोटी रुपयांची होते असे पतसंस्थेचे चेअरमन कणसे यांनी सांगितले
यावेळी गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार,विस्तार अधिकारी अनिल पुदाट, सुभाष शिंदे,सेवानिवृत्त शिक्षक वसंत ताकटे, निर्मळ,अशोक गायकवाड, सुनील बडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाहेद पठाण,केंद्रीय मुख्याध्यापक इस्माईल शेख,शौकत पठाण, दिलीप थोटे,विलास बोबडे,राजधर फसले,माजी चेअरमन अलकनंदा नागरगोजे,आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकाश सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.पंडीत भोसले,उत्तम खरात, मुश्ताक शेख, मंगल शेंडगे,केंद्र प्रमुख संतोष पवार शमीम पठाण,मुख्याध्यापक मनोज सरग,राजेंद्र सुपेकर,संतराम गोर्डे, राम तांगडे,अंबेकर, नजन तात्या, विष्णू भंडारे, बळीराम भुमरे,पंडीत भोसले,पातकळ,गणपत मिटकर,वाहेद पठाण,उमेश सोनवणे, अशोक गुळजकर,समीम पठाण,अमोल एरंडे,सोमनाथ नाटकर,दिपक बोरुडे,मयुर शिसोदे, प्रविण वाघमोडे,भावना पवार,ज्ञानदेव शिरवत,ज्ञानेश्वर कपटी, नारायण बोबडे, बाबासाहेब येळे,उत्तम फंडे, गणेश वाघ, माऊली उभेदळ, नितिन,कपटी, भगवान वाघमोडे उपस्थित होते.