पैठण तालुक्यातील जोगेश्वरी मंदीर मध्ये नवरात्रोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोन

0

पैठण,दिं.२५. :  पैठण तालुक्यातील जायकवाडी येथील प्राचीन असलेल्या श्री संस्थान जोगेश्वरी मंदीरा मध्ये नवरात्रोत्सव निमित्ताने मंदीर परीसर सज्ज झाले असून येथील श्री जोगेश्वरी माता ही पैठण क्षेत्रातील ३२ तिर्थावली मधील प्रथम तिर्थ असून अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे हे पिठ आहे.

      येथील जोगेश्वरी मंदीर हे पूर्वी जायकवाडी धरणात गेलेल्या लिंगतपुरी,खिर्डी या दोन्ही गावालगत गोदावरी नदीच्या काठी त्रिवेणी संगमावर होते सन १९७२ ला जायकवाडी धरण झाल्याने येथील प्राचीन मंदिर पाण्यात गेले त्यामुळे त्यांचे पुनर्वसन जायकवाडी डाव्या कालव्यालगत कातपुर हद्यीत झाले येथील श्री जोगेश्वरी माता समवेत श्री राम , लक्ष्मन,सिता, महादेव, गणपती, दक्षिण मुखी मारोती व श्री कृष्ण इत्यादी देवतांची येथे निसर्गरम्य वातावरणात मंदीरे आहेत येथील जोगेश्वरी देवी ही नवसाला पावणारी अशी जागृत देवी असून ज्याची कुलदैवत जोगेश्वरी देवी आहे असे भाविक राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्रासह इतर ठिकाणी असून ते न चूकता दरवर्षी नित्यनेमाने नवरात्र सह इतर वेळीही दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.

    येथील पुजारी हभप मुकुंद महाराज जोशी यांनी सांगितले की, श्री जोगेश्वरी देवी ही अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी असुन एक भक्त नेहमी नित्यनेमाने अंबेजोगाई येथे दर्शनासाठी जात होता परंतु त्याला दर्शनासाठी वृध्दकाळाने  जाता येत नव्हते त्याने देवीला प्रार्थना केली मला तुझ्या दर्शनाला येणे शक्य होत नाही तुच माझ्याकडे यावं त्यामुळे मला नेहमी दर्शन होईल देवीने त्याची प्रार्थना ऐकून येण्याचे कबूल केले पण अट अशी घातली की मी तुझ्या मागे मागे येईल व तु जेथे मागे वळून पाहशील तिथेच मी स्थानापन्न होईल त्याप्रमाणे देवी भक्तां सोबत पूर्वीच्या त्रिवेणी संगमावर आली परंतु भक्ताला शंका आल्याने त्याने मागे वळून पाहिले असता देवी तिथेच त्रिवेणी संगमावर स्थान्नापन्न झाली तेच पुरातन जोगेश्वरी मंदीर होय.

     नवरात्रीच्या काळात नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने येथे विविध धार्मिक उत्सव साजरा करण्यात येतो तर नवमीच्या दिवशी होम हवन होऊन विजया दशमीला शमी,आपटा ,शस्र पुजन करुन सिम्मोलंघनाच्या कार्यक्रमाने येथे सोने(आपटा पान) लुटण्याचा कार्यक्रम होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here