पैठण तालुक्यातील नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तरूणांच्या ताब्यात मातब्बरांना धक्का

0

पैठण,दिं.७: पैठण तालुक्यातील नारायणगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी रोजगार हमी व फलोत्पादन तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या ताब्यात गेली असून यात बहूतांश तरूणाचा समावेश असून मतदारांनी निवडणुकीत तरूणांच्या हातात सत्ता दिली असून निवडणुकीत मातब्बरांना धक्का बसला आहे.

  गुरूवार दिं.७ रोजी पैठण येथील उपनिबंधक कार्यालयात नारायणगाव येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी संदर्भात चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड प्रक्रिया पार पडली संस्थेच्या चेअरमनपदी सुभाष बप्पासाहेब रोडे तर व्हाईस चेअरमनपदी संदीप शिवाजी गवळी यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री बाबर, सेक्रेटरी तुकाराम पुरी यांनी जाहीर केले यावेळी संचालक अशोक रोडे, संतोष गवळी,गोंविद गवळी, रामनाथ नवले,दत्ता क्षिरसागर,कडूबाई रोडे,लिलावती म्हस्के, विठ्ठल मिसाळ,खंडू नाचन, एकनाथ क्षिरसागर,दिपक जांभळे उपस्थित होते या निवडीचे जिल्हा परीषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास बापु भुमरे पाटील,संजय म्हस्के, मनोज म्हस्के, नितीन रोडे,राजु नवले, हरीभाऊ गवळी, दादासाहेब रोडे,दत्ता रोडे, शिवाजी रोडे, योगेश रोडे यांनी अभिनंदन केले आहे.

———–

फोटो : पैठण : नारायणगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष बप्पासाहेब रोडे तर व्हाईस चेअरमनपदी संदीप शिवाजी गवळी यांची बिनविरोध निवड झाली.(छायाचित्र : विनायक मोकासे, पैठण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here